Join us  

कमी धावसंख्येचा बचाव करणे शिकावे लागेल - रोहित शर्मा

रोहित शर्मा : काही चुकांमुळे गमवावा लागला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 3:08 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वकप स्पर्धेत जर चांगली कामगिरी करायची असेल तर छोट्या लक्ष्याचा बचाव करणे शिकावे लागेल,’ असा सल्ला भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजांना दिला. भारताने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशला १४९ धावांचे लक्ष्य दिले होते. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘या लक्ष्याचा बचाव करता आला असता, पण आम्ही क्षेत्ररक्षणात काही चुका केल्या. आमचे खेळाडू विशेष अनुभवी नसून यापासून बोध घेतील.’ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या न उभारणे आणि आपल्या अपेक्षित छोट्या धावसंख्येचा बचाव न करणे भारतीय संघाची कमकुवत बाजू ठरत आहे. गेल्या सात टी२० सामन्यात लक्ष्याचा बचाव करताना पाचवेळा भारतीय संघ अपयशी ठरला. भारताने या सामन्यात दोन वेगवान गोलंदाज दीपक चाहर व खलील अहमद आणि फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल, कृणाल पांड्या व वाशिंगटन सुंदर यांना संधी दिली. चहलचा वगळता अन्य गोलंदाजांना छाप सोडता आली नाही.

रोहित म्हणाला, ‘हे खेळाडू गेल्या काही सामन्यांपासून भारताचे टी२० मध्ये प्रतिनिधित्व करीत आहे. ते चांगला प्रयत्न करीत आहेत, पण त्यांना लक्ष्याचा बचाव करणे शिकावे लागले. त्यांना रणनीतीनुसार गोलंदाजी करावी लागेल. त्यांच्यात दमदार पुनरागमन करण्याची क्षमता असून ते यशस्वी ठरतात किंवा नाही, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईल.’ संघात पुनरागमन करणाºया चहालच्या कामगिरीवर रोहित समाधानी दिसला. रोहित म्हणाला,‘चहल महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाजांचा जम बसल्यानंतर मधले षटके किती महत्त्वाचे असतात, हे त्याने सिद्ध केले. काय करायचे आहे, हे त्याला कळते. त्यामुळे कर्णधाराचे काम थोडे सोपे होते.’रोहितने केली रिषभची पाठराखणअचूक रिव्ह्यू घेण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीचे नाव एकदम डोळ्यापुढे येते, पण त्याचा वारसदार रिषभ पंत बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात यात अपयशी ठरला. त्यासाठी कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठराखण केली. या लढतीत १० व्या षटकात डीआरएसचा निर्णय भारताच्या विरोधात गेला. शेवटी ही चूक संघासाठी महागडी ठरली.रोहितने कबुल केले की, ‘अशा रिव्ह्यूमध्ये कर्णधार पूर्णपणे गोलंदाज व यष्टिरक्षकावर अवलंबून असतो. पंत सध्या युवा असून काळानुरुप तो चांगले निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात करेल. त्याला ही स्थिती समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तो अशा प्रकारचे निर्णय घेवू शकतो किंवा नाही, यावर आताच भाष्य करणे घाईचे ठरेल. त्याला असे निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल.’ त्याचवेळी, ‘मुशफिकूर रहीमविरुद्ध रिव्ह्यू घेण्याची चूक केली नसती, तर भारताला सामना जिंकता आला असता,’ असेही रोहितने कबुल केले.‘निसटता पराभव पत्करायचा नव्हता’चुरशीच्या टी२० पराभवाचे शल्य जेवढे मुशफिकूर रहीमने अनुभवले आहे तेवढे शल्य अन्य कुणाच्या वाटल्या आलेले नाही. गेले दोन खडतर आठवडे विसरुन क्रिकेट सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुशफिकूर प्रयत्नशील होता. बेंगळुरू २०१६ मध्ये विश्वचषक टी२० सामन्यात भारताविरुद्ध बांगलादेश एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. रहीम म्हणाला, ‘आम्ही भारताविरुद्ध अनेक चुरशीचे सामने खेळले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा स्थितीत पराभूत न होण्याचा आम्ही निर्धार केला होता. गेले दोन आठवडे माझ्या कारकीर्दीतील सर्वांत खडतर होते.’

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारत