Join us

IPL 2023: IPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकांनी गेम प्लॅन सांगत फुंकले रणशिंग!

मुंबई इंडियन्सचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी आगामी हंगामासाठी सज्ज असल्याचे म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 12:59 IST

Open in App

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी आगामी आयपीएल 2023 बाबत रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी हंगामात संघाची कामगिरी कशी असावी यावर भाष्य केले आहे. याशिवाय बाउचर यांनी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

आयपीएल 2023च्या मिनी लिलावासाठी आता जवळपास 15 दिवसांचा कालावधी राहिला आहे. अशातच पाच वेळा आयपीएलचा किताब पटकावणारी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माजी खेळाडू मार्क बाउचर आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. याविषयी बोलताना बाउचर म्हणाले की, आगामी आयपीएल 2023 च्या आधी त्यांना मुंबईच्या संघात पुनर्बांधणी करायची असून कधी न हार मारणारा संघ म्हणून असलेली ओळख पुन्हा निर्माण करायची आहे. 

"तुम्ही खाली पडू शकता, पण तुम्हाला पुन्हा उठायचे आहे"खरं तर आयपीएलच्या मागील 2 हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. संघाला प्ले ऑफमध्ये जागा मिळवता आली नव्हती. मात्र मार्क बाउचर यांनी गेम प्लॅन सांगत आगामी हंगामासाठी रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. "संघाने पराभवातून धडा घेतला आहे आणि संघाने पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आणि दबावाला बळी न पडण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. वानखेडे स्टेडियमवरील चाहत्यांच्या पाठिंब्याचा फ्रँचायझीला नक्कीच फायदा होईल आणि आगामी आयपीएल 2023 मध्ये ते मोठी भूमिका बजावतील", अशा विश्वासही बाउचर यांनी व्यक्त केला. 

आगामी हंगामाबद्दल बोलताना बाउचर यांनी म्हटले, "आम्ही मागील दोन हंगामातील आमच्या प्रदर्शनावर चर्चा केली. कधीकधी वाईट काळातून जाणे ही वाईट गोष्ट नसते. मला वाटते की आम्हाला जो धडा मिळाला तो महत्त्वाचा आहे. आम्ही मीटिंग दरम्यान या वाईट काळात शिकलेल्या धड्यांबद्दल चर्चा केली. मला वाटते की ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही खाली पडू शकता, पण तुम्हाला पुन्हा उभे राहावे लागेल."

"पुन्हा एकदा उठून उभे राहू""माझ्यासाठी आगामी हंगाम पुन्हा एकदा उठून उभे राहण्यासाठी असणार आहे. मुंबई इंडियन्सचा चाहता वर्ग खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या चाहत्यांचा पाठिंबा असेल तर आमच्या घरच्या मैदानावर कोणत्याही संघाविरुद्ध खेळणे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आगामी हंगामात आमच्या चाहत्यांच्या भरघोस पाठिंब्याची आम्ही अपेक्षा करतो", असे बाउचर यांनी अधिक म्हटले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीग
Open in App