Join us

EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट 

क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 11:15 IST

Open in App

कोरोना व्हायरसमुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे अनेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. पण, याही काळात खेळाडू आपल्या फिटनेसवरही लक्ष ठेवून आहेत. खेळाडू आपली स्टाईलही जपत आहेत. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं नुकताच इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात हार्दिक खुपच स्टायलिश दिसत आहे. पण, त्यानं घातलेला शर्ट चाहत्यांना एवढा काही आवडलेला नाही. या शर्टची किंमत ऐकून मात्र चाहत्यांना चक्कर नक्कीच आली असेल. 

हे शर्ट रीमैगिनेटेड स्ट्रीट स्टाईलचे आहे. शर्टवर एक पॉइनेटेड कॉलर, वाइड क्वर्स, और वाटरफॉल प्रिंट आहे. या शर्टची किंमत 40, 997 इतकी आहे. या किमतीत आपण 30 ते 40 ब्रांडेड शर्ट घेऊ शकतो.   भारतीय क्रिकेटपटूकडे स्टायलिस्ट आणि महागडे कपडे व वस्तू आहेत. लाखो रुपयांचा पजामा सेट, 25 हजाराचे बॉक्सर्स आणि 1 लाख रुपयांचे शूज यामुळे हार्दिक अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्यानं नुकतेच एक घड्याळ घेतले आणि Patek Phillipe Nautilus या घडाळ्याची किंमत 1 कोटी आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी

Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ