Join us
Daily Top 2Weekly Top 5

... तर विराट कोहलीला संघाबाहेर काढणार का, माजी क्रिकेटपटूंचा सवाल

जर संघातील सर्वांना समान न्याय दिला आणि कोहली योयो टेस्टमध्ये नापास झाला, तर त्याला संघाबाहेर काढणार का, असा सवाल या क्रिकेटपटूनी उपस्थित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:19 IST

Open in App

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघात सर्व खेळाडूंना समान न्याय दिला जातो, असं बऱ्याच माजी क्रिकेटपटूना वाटत आहे. भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीला वेगळा न्याय दिला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. जर सर्वांना समान न्याय दिला आणि कोहली योयो टेस्टमध्ये नापास झाला, तर त्याला संघाबाहेर काढणार का, असा सवाल या क्रिकेटपटूनी उपस्थित केला आहे.आयपीएलनंतर लगेचच मोहम्मद शमी आणि अंबाती रायुडू यांची योयो टेस्ट घेण्यात आली होती, या टेस्टमध्ये हे दोघेही नापास ठरले होते. त्याचवेळी कोहलीची योयो टेस्ट का घेण्यात आली नाही, कोहलीला या टेस्टसाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला. त्यामुळे कोहलीला या टेस्ट साठी जास्त वेळ मिळाला आणि त्याला वेगळा न्याय देण्यात आला, असं काही माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केलं आहे. एकंदरीत योयो टेस्ट आणि कोहलीला देण्यात येणारे झुकते माप यावर भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीका केली आहे. यावेळी हरभजन म्हणाला की, क्रिकेट खेळायला फिटनेस हवा, पण योयो टेस्ट त्यासाठी योग्य नाही. क्रिकेटमध्ये जास्त गुणवत्तेला वाव देण्यात यावा आणि कामगिरीसाठी लागणाऱ्या फिटनेसचा विचार केला हवा. ही योयो टेस्ट फुटबॉल आणि हॉकी या खेळांसाठी योग्य आहे, क्रिकेटसाठी नाही."याबाबत आकाश म्हणाला की," विराट हा कर्णधार आहे, त्याला खेळताना तुम्हाला पहायचे आहे, त्यामुळे तुम्ही त्याला फिटनेस टेस्टमध्ये सवलत देत, मग हा न्याय अन्य खेळाडूंना का देण्यात येत नाही. खेळाडूंना एक आणि कर्णधाराला दुसरा न्याय, ही गोष्ट चुकीची आहे. जर विराट योयो टेस्टमध्ये नापास झाला तर त्याला संघाबाहेर काढणार का? "

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेटइंग्लंड विरुद्ध भारतहरभजन सिंगयो यो चाचणी