भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यासाठी २०२५ हे वर्ष खास आणि अविस्मरणीय राहिले. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी बिहार संघाकडून रणजी पदार्पणात इतिहास रचणारा वैभव सूर्यवंशी आता टीम इंडिया कडून धमाक्यावर धमाका करत सातत्याने चर्चेत आहे. बिहारच्या पोरानं सर्वात कमी वयात IPL मध्ये एन्ट्री मारली. पदार्पणाच्या हंगामात ३५ चेंडूतील वादळी शतकी खेळीसह त्याने क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीची हवा! यंदाच्या वर्षातील ठरला सर्वाधिक चर्चित चेहरा
IPL मध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून छोटा पॅक मोठा धमाका शो दाखवल्यावर वैभव सूर्यवंशी याने अंडर १९ संघासह भारत 'अ' संघात स्थान मिळवले. इथंही त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश केला. सातत्याने लक्षवेधी कामगिरी केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी या खेळाडूबद्दल जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुकता दाखवली. त्यामुळेच यंदाच्या वर्षाच्या सरशेवटी MS धोनी आणि विराट कोहली यासारख्या दिग्गजांना मागे टाकत वैभव सूर्यवंशी यंदाच्या वर्षभरात आपला ट्रेंड सेट करून सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रिकेटर्सच्या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे.
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
वैभवसह टॉप ५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन महिला क्रिकेटर जेमिमाचाही लागतो नंबर
गूगल ट्रेंड्सनुसार, २०२५ या वर्षात Google वर सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत वैभव सूर्यंवशी हा सर्वात आघाडीवर आहे. टॉप ट्रेंडमध्ये राहून १४ वर्षांच्या पोरानं आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत IPL स्पर्धेत पंजाब किंग्जच्या ताफ्यातून खेळताना लक्षवेधी ठरलेल्या प्रियांश आर्यचा नंबर लागतो. भारतीय टी-२० संघाचा स्फोटक सलामीवीर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रशीद खान आणि महिला क्रिकेट संघातील स्टार जेमिमा रॉड्रिग्ज या यादीत टॉप ५ मध्ये असल्याचे दिसते.
IPL ते रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेपर्यंत प्रत्येक स्पर्धेत दाखवली धमक
२०२४ च्या लिलावात वयाच्या १३ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या संघाने वैभव सूर्यवंशी याच्यावर १ कोटी १० लाख रुपयांची बोली लावली होती. हा एक विक्रमच होता. २०२५ च्या हंगामात त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांनाच थक्क करून सोडले. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने विक्रमी शतक झळकावले. नुकत्यात पार पडलेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेतही त्याने भारतीय संघाकडून विक्रमी शतक झळकावले होते.