यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची नामांकन जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:12 PM2024-03-04T14:12:59+5:302024-03-04T14:13:47+5:30

whatsapp join usJoin us
Yashasvi Jaiswal Nominated for ICC Player of the Month award for February 2024 along with Kane Williamson & Pathum Nissanka | यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

यशस्वी जैस्वाल ICC च्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरणार; केन विलियम्सनला टक्कर देणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's Player of the Month - February 2024 - ICC ने फेब्रुवारी महिन्याच्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची नामांकन जाहीर केली. भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हा या शर्यतीत आहे आणि त्याच्यासमोर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन व श्रीलंकेचा पथूम निसंका यांचे आव्हान आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात केन विलियम्सन याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या कसोटीत दोन शतकं झळकावली आणि त्यानंतर हॅमिल्टन कसोटीच्या चौथ्या डावात नाबाद १३३ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. एकाच कसोटीत दोन शतकं झळकावण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. ही कसोटी मालिका जिंकून न्यूझीलंडने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वल स्थानावर झेप घेतली होती. 


युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवली आहे. तो या पुरस्कारासाठी स्ट्रॉंग स्पर्धक आहे. त्याने विशाखापट्टणम कसोटीत द्विशतक झळकावले होते आणि त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात द्विशतकी खेळी केली होती. या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या दिशेने तो कूच करत आहे. 


श्रीलंकेचा पथून निसंका हाही या शर्यतीत आहे. २५ वर्षीय फलंदाजाने नुकत्याच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत १३९ चेंडूंत नाबाद २१० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने १०१ चेंडूंत ११८ धावा केल्या आहेत. त्याने सनथ जयसूर्याचा २४ वर्षांपूर्वीचा वन डे क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला.   

Web Title: Yashasvi Jaiswal Nominated for ICC Player of the Month award for February 2024 along with Kane Williamson & Pathum Nissanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.