दोघींकडून बलात्काराचे आरोप असलेला क्रिकेटर बोहल्यावर चढला; कंटेंट क्रिएटरसोबत उरकले लग्न...

Yash Dayal Shweta Pundir Wedding: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार खेळाडू यश दयालने श्वेता पुंडीरशी लग्न केले आहे. कानपूरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. वाचा सविस्तर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:23 IST2026-03-16T09:21:12+5:302026-03-16T09:23:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Yash Dayal Shweta Pundir Wedding: RCB Cricketer accused of rape by two women gets married to content creator Shweta Pundir | दोघींकडून बलात्काराचे आरोप असलेला क्रिकेटर बोहल्यावर चढला; कंटेंट क्रिएटरसोबत उरकले लग्न...

दोघींकडून बलात्काराचे आरोप असलेला क्रिकेटर बोहल्यावर चढला; कंटेंट क्रिएटरसोबत उरकले लग्न...

कानपूर: आयपीएलमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' कडून खेळणारा आणि आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा युवा गोलंदाज यश दयाल विवाहबंधनात अडकला आहे. यशने त्याची मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर श्वेता पुंडीर हिच्याशी लग्नाची नवी इनिंग सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यश दयालवर दोन महिलांनी बलात्काराचे आरोप केलेले आहेत, त्यापैकी एक अल्पवयीन मुलगी असून सध्या दयाल हा जामिनावर बाहेर आहे. 

यश आणि श्वेता यांचा विवाह सोहळा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अतिशय थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला यशचे जवळचे नातेवाईक, मित्र परिवार आणि क्रिकेट विश्वातील काही मोजके खेळाडू उपस्थित होते. सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोण आहे श्वेता पुंडीर?
यश दयालची पत्नी श्वेता पुंडीर ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इंस्टाग्रामवर मोठे फॅन फॉलोइंग असून ती तिच्या हटके व्हिडिओजसाठी ओळखली जाते. गेल्या काही काळापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी आपल्या नात्याला लग्नाचे स्वरूप दिले आहे.

गंभीर आरोपांचे सावट
यश दयाल सध्या दोन वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाई लढत आहे:
१. गाझियाबाद प्रकरण: एका महिलेने यशवर लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षे शारीरिक आणि भावनिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
२. जयपूर अल्पवयीन मुलगी प्रकरण: २०२३ मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने यशवर बलात्काराचा आरोप केला होता. क्रिकेटमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने त्याने हे कृत्य केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने यश दयालला या प्रकरणात अंतरिम दिलासा दिला होता. यशला जामीन मिळाल्यानंतर श्वेता पुंडीरने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत 'हा न्याय आहे' अशी पोस्ट केली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. आता या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी कानपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

क्रिकेट कारकीर्द धोक्यात?
यश दयाल हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू असला तरी, त्याच्यावर असलेल्या या गंभीर आरोपांमुळे त्याच्या भविष्यातील क्रिकेट कारकीर्दीवर टांगती तलवार आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title : बलात्कार के आरोपों से घिरे क्रिकेटर ने कंटेंट क्रिएटर से शादी की।

Web Summary : बलात्कार के आरोपों का सामना कर रहे क्रिकेटर यश दयाल ने कानपुर में कंटेंट क्रिएटर श्वेता पुंडीर से शादी की। दयाल जमानत पर बाहर हैं, जिन पर दो महिलाओं ने आरोप लगाए हैं, जिनमें एक नाबालिग भी शामिल है। शादी कानूनी लड़ाइयों के बीच हुई, जिससे उनके करियर पर असर पड़ सकता है।

Web Title : Accused cricketer weds content creator amid rape allegations controversy.

Web Summary : Cricketer Yash Dayal, facing rape accusations, married content creator Shweta Pundir in Kanpur. Dayal is out on bail, facing allegations from two women, including a minor. The wedding occurred amidst ongoing legal battles, potentially impacting his career.