Join us

डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन किंवा तीन बॅचेस मधून इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 05:47 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघातील पहिली बॅच मंगळवारी पहाटे इंग्लंडकडे रवाना झाली. त्यात विराट कोहली, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर यांच्यासह मुख्य कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. ७ ते ११ जून दरम्यान हा सामना द ओव्हलवर खेळविला जाईल. 

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन किंवा तीन बॅचेस मधून इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहेत.  पहिली बॅच पहाटे ४:३० ला रवाना झाली. संघात सहभागी ज्या खेळाडूंचे संघ आयपीएल प्ले ऑफमध्ये दाखल झाले, ते सर्वजण नंतर इंग्लंडला जातील, अशा खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, केएस भरत आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे.

कसोटी तज्ज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजारा हा आधीपासूनच इंग्लिश काैंटी खेळत आहे. भारताचे अनेक खेळाडू दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर डब्ल्यूटीसी फायनल खेळणार असून, ऑस्ट्रेलियाचे केवळ तीन खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते. भारत २०२१ ला डब्ल्यूटीसी उपविजेता होता. पहिल्यांदा डब्ल्यूटीसी जिंकण्याची यंदा भारताकडे संधी असेल.

हेजलवुड फायनल खेळणारमेलबोर्न : अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड हा भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल आणि   इंग्लंडविरुद्ध ॲशेस खेळण्यासाठी फिट असून तो उपलब्ध असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी दिली. हेजलवुड आयपीएलमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व करत होता. दोन आठवड्यांआधी किरकोळ जखम होताच तो ऑस्ट्रेलियाला परतला.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र ३२ वर्षांचा हा वेगवान गोलंदाज फिट असल्याचा दावा केला.  

टॅग्स :विराट कोहलीआर अश्विनभारतीय क्रिकेट संघ
Open in App