WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील फायनलच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. स्कॉट बोलंडच्या एका षटकाने संपूर्ण मॅच फिरली. सेट फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याचा अविश्वसनीय झेल स्टीव्ह स्मिथने टिपला अन् नंतर एका चेंडूच्या फरकाने बोलंडने अष्टपैलू रवींद्र जडेजाला ( ०) चालतं केलं. आता अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane) सर्व भीस्त होती, परंतु मिचेल स्टार्कने त्याची विकेट मिळवली. पण, त्याने मोठा विक्रम करून दाखवला आहे.
४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला. भारताबाहेर कसोटीत २०८२* धावांची भागीदारीचा टप्पा या दोघांनी ओलांडला. राहुल द्रविड वि सचिन तेंडुलकर ( ३७२८), राहुल द्रविड व व्ही व्ही एस लक्ष्मण ( २६८१) आणि तेंडुलकर व सौरव गांगुली ( २४०२) यांनी असा पराक्रम केला आहे. स्कॉट बॉलंडने टाकलेल्या ४७व्या षटकात विराटला बाद करण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्सने DRS घेतला, पंरतु चेंडू व बॅट यांच्यात संपर्कच झाला नव्हता. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते, पण, तिसऱ्या चेंडूवर घात घाला.
अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. भारताला २१२ धावांवर सहावा धक्का बसला. नॅथन लाएनने शार्दूल ठाकूरला पायचीत केले अन् भारताचा सातवा फलंदाज २१३ धावांवर माघारी परतला.