WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:11 AM2021-06-15T11:11:00+5:302021-06-15T11:26:40+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2021 : New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final | WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Test Championship Final : इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर 22 वर्षांनी कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत किवींनी 1-0 असा विजय मिळवला. त्या मालिकेत सर्वाधिक 300+ धावा करणाऱ्या फलंदाजाला संधी देऊन किवी संघानं टीम इंडियाचं टेंशन वाढवण्याची रणनीती आखली आहे. न्यूझीलंडनं 18 ते 22 जून या कालावधीत होणाऱ्या WTC Finalसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून फक्त एकाच फिरकीपटूला स्थान दिले आहे. ( The BLACKCAPS have confirmed their 15-man squad to contest the inaugural ICC World Test Championship Final against India)

अजाझ पटेल ( Ajaz Patel) हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे, तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे. डॉग ब्रेसवेल, जेकब डफ्फी, डॅरील मिचेल, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ही पाचही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील संघाचे सदस्य होते. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी या खेळाडूंचे आभार मानले. डेव्हॉन कॉनवेय यानं इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक 306 धावा चोपल्या आहेत. 

ICC WTC Final: विजेत्या संघाला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस अन् मानाची गदा, आयसीसीनं जाहीर केली बक्षीस रक्कम


स्टीड यांनी सांगितले की,''या सामन्यासाठी संघ निवडताना आम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागले. मिचेल व डॅरील यांचे योगदान अमुल्य आहे. अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू संघात असेल आणि त्यानं इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. WTC फायनलमध्ये तो ट्रम्प कार्ड ठरेल, असा विश्वास आम्हाला आहे. कॉलीन हा कसोटी संघाचा सदस्य आहेच आणि त्यानं लॉर्ड्सवर कमबॅक करताना दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याची निवड केली गेली आहे. केन विलियम्सन व बीजे वॉटलिंग यांना पुरेशी विश्रांती मिळाली आहे. अंतिम सामन्यासाठी ते पुर्णपणे तंदुरूस्त होतील, असा विश्वास आहे.''


 
न्यूझीलंडचा संघ ( New Zealand squad for the WTC final:)
केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग ( Kane Williamson (C), Tom Blundell, Trent Boult, Devon Conway, Colin De Grandhomme, Matt Henry, Kyle Jamieson, Tom Latham, Henry Nicholls, Ajaz Patel, Tim Southee, Ross Taylor, Neil Wagner, BJ Watling, Will Young.) 

Web Title: WTC Final 2021 : New Zealnd's squad confirmed for ICC World Test Championship Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.