WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : दोन वर्षांची मेहनत, सर्वाधिक १२ कसोटी विजय. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला मानावी लागली हार.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:27 AM2021-06-24T11:27:23+5:302021-06-24T11:27:52+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2021 IND vs NZ: Why did Team India lose in WTC Final ?; Sachin Tendulkar said the important reason | WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : दोन वर्षांची मेहनत, सर्वाधिक १२ कसोटी विजय. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला मानावी लागली हार. त्यामुळे पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे विराट कोहली अँड टीमचे स्वप्न अपूर्ण राहिले. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून फायनल जिंकली अन् कसोटी वर्ल्ड कप नावावर केला. विराट कोहलीला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाच्या नजीक जाऊन रिकामी हातानं  माघारी परतावे लागले. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभूत केले होते, तर २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानकडून विराट अँड टीमला हार मानावी लागली होती. WTC Finalमध्ये टीम इंडियाचे नेमकं कुठे चुकलं हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं सांगितलं. 

 टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचे सचिन तेंडुलकरनं अभिनंदन केलं. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर कायले जेमिन्सननं दुसऱ्या डावात टीम इंडियाला जोरदार झटके दिले. भारताचा दुसरा डाव १७० धावांत गुंडाळून न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य दोन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. केन विलियम्सननं नाबाद ५२ आणि रॉस टेलरनं नाबाद ४७ धावा करताना संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, तीन सामन्यांची मालिका व्हायला हवी - विराट कोहली


भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या या सामन्याचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. सहाव्या दिवशी हवामानानं कुस बदलली अन् संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला. सहाव्या दिवसाच्या पहिल्या १० षटकांतच सामना फिरला. कायले जेमिन्सननं सुरुवातीला विराट कोहली व चेतेश्वर पुजारा या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर टीम साऊदीनं अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. त्यामुळे संघावर दबाव वाढला. रिषभ पंतनं फटकेबाजी केली, परंतु त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.

... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video 

सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की, जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचे अभिनंदन... तुम्ही वर्चस्व गाजवले. भारतीय संघ त्यांच्या कामगिरीने निराश झाला असेल. मी आधीच सांगितले होते की सहाव्या दिवसाची पहिली १० षटकं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि भारतानं दहा चेंडूंत विराट व पुजारा या दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे संघावर प्रचंड दडपण वाढलं...  

Web Title: WTC Final 2021 IND vs NZ: Why did Team India lose in WTC Final ?; Sachin Tendulkar said the important reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.