Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : मोठी अपडेट; आजचा खेळ होणार की नाही?, बीसीसीआयनं दिली Big Breaking! 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand :  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 6:48 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand :  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. आजपासून ते 22 जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात हा ऐतिहासिक सामना होणार आहे. पण, या पाचही दिवसांवर पावसाचे सावट आहे. या सामन्याचा निकाल लागावा यासाठी आयसीसीनं 23 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. अडीच-तीन तासांचा वेळ वाया गेल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे. मैदान सुकवण्याचं काम सुरू असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता पंच खेळपट्टीची पाहणी करून  निर्णय देणार आहेत.WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final  भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग IND vs NZ World Test Championship, 

पाऊस थांबला अन् अश्विनची कन्या नाचायला लागली...

विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला... जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची  समान विभागणी केली जाईल.   WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबीसीसीआयपाऊसभारत विरुद्ध न्यूझीलंड