World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे राखीव दिवशी म्हणजेच २३ जूनला सामना होऊनही निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे. पण, क्रिकेट चाहते भारत-न्यूझीलंड यांच्यातला लाइव्ह अॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे पाचव्या व सहाव्या दिवसाचा हवामानाचा अंदाज कसा असेल, हे जाणून घेण्यासाठी ते साऊदॅम्प्टनचा हवामान गुगल सर्च करत आहेत. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
तिसऱ्या दिवशी 3 बाद 146 धावांवरून सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत. पण, चौथ्या दिवशी एकही चेंडू न पडता दिवस रद्द करावा लागला. आतापर्यंत फक्त १४१ षटकं फेकली गेली आहेत. त्यामुळे उर्वरित दोन दिवशी वाया गेलेल्या वेळेची भरपाई करणे जवळपास अशक्य आहे. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today
पाचव्या व सहाव्या दिवशी सामन्याच्या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. २२ जूनला ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज आहे.
![]()
सामन्याचा निकाल ड्रॉ लागल्यास संयुक्त जेतेपद
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची समान विभागणी केली जाईल.