मोहम्मद शमीनं विकेट्स घेण्याचे सत्र सुरू केल्यानंतर विराट कोहलीचा मैदानावरील जोश अधिकच वाढलेला पाहायला मिळाला. तो उपस्थित प्रेक्षकांना टीम इंडियाला चिअर करण्यासाठी बोलत होता. साऊदॅम्प्टनच्या हवामानानं सर्वांना हैराण केलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली थंडीनं कुडकुडत होता. मोहम्मद शमीनं थंडीमुळे टॉवेल गुंडाळला होता. थंडीमुळे विराट हात हातावर घासताना दिसला अन् त्याची ही कृती पाहून बाजूलाच उभ्या असलेल्या रोहित शर्मानं भारी रिअॅक्शन दिली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ..
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी दिली. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी त्यांना माघारी पाठवले. केन विलियम्सन व रॉस टेलर ही जोडी बचावात्मक खेळ करून भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहत होती. पण, पाचव्या दिवशी मोहम्मद शमीनं किवींना धक्का दिला. त्यानं रॉस टेलरला ( ११) बाद केले. हेन्री निकोल्सला ( ७) इशांत शर्मानं
रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. शमीने पुढच्या षटकात किवींना आणखी एक धक्का दिला अन् बीजे वॉटलिंगचा त्रिफळा उडवला. IND vs NZ World Test Championship
कॉलिन डी ग्रँडहोम ( १३) व कायले जेमिन्सन ( २१) यांनी पिछाडी भरून काढण्यासाठी झटपट धावा केल्या. पण, त्यांनाही शमीनं माघारी पाठवले. केन एका बाजूनं खेळपट्टीवर तग धरून होता अन् त्यानं तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली. पाचव्या दिवसाचे पहिलेच षटक टाकणाऱ्या आर अश्विननं किवींना ९वा झटका दिला. रवींद्र जडेजानं किवींच्या दहाव्या फलंदाजाला माघारी पाठवले. न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final