ठळक मुद्दे आर अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली.
World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत केली. कायले जेमिन्सननं टीम इंडियाच्या पाच फलंदाजांना बाद करून मोठा धक्का दिला. 3 बाद 146 धावांवरून आजच्या दिवसाची सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विननं ही जोडी तोडून टीम इंडियाला धक्का दिला. मोहम्मद शमी वगळता भारताच्या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी निराश केले. शमीच्या गोलंदाजीवर बऱ्याच संधी निर्माण झाल्या, परंतु किवी फलंदाजांचं नशीब बलवान होतं.Ind vs NZ Test Final, WTC final 2021
कायले जेमिन्सननं पाच विकेट्स ( 5/31) घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. WTC Final मध्ये एकाच डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. जेमिन्सननं विराटला 44 धावांवर पायचीत केलं. रिषभ पंतला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु तो 49 धावांवर माघारी परतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात जेमिन्सननं इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना बाद केले. मोहम्मद शमीनं खणखणीत चौकार मारून सुरुवात केली. पण, ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात जडेजाला ( 15) बाद करून भारताचा पहिला डाव 217 धावांत गडगडला. WTC Final 2021, WTC Final 2021
नव्या चेंडूवर कमाल दाखवण्यात भारतीय जलदगती गोलंदाजांना अपयश आले. जेमिन्सननं त्याच्या उंचीचा करून घेतलेला फायला ईशांत शर्माला करता आला नाही. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांचे चेंडू फार कमी स्वींग होत होते. त्यामुळे किवी फलंदाज अगदी सहज खेळ करताना दिसले. टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी भारतीय गोलंदाजांच्या दिशाहीन गोलंदाजीचा फायदा उचलताना पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. आर अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली.Ind vs Nz WTC Final Today, IND vs NZ World Test Championship
इशांत शर्मानं दुसरा झटका दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या कॉनवेला त्यानं बाद केलं, मोहम्मद शमीनं सुरेख झेल टिपला. कॉनवेनं 153 चेंडूंत 6 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today