WTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार!

ICC WTC Final 2021 : आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग २ आधीच्या भागात आपण सर्वसाधारण नियम व पध्दती जाणून घेतली. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की मालिकेतला विजय किंवा पराजय यावर मालिकेचा विजेता ठरत असतो कारण हि मालिका दोन संघांमध्ये खेळवली जात असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:15 AM2021-06-17T10:15:00+5:302021-06-17T10:15:01+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2021: how two team reach in WTC Final, know about point tally method | WTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार!

WTC Final 2021 : कोरोना संकटाचा मुकाबला करत असे ठरले अंतिम फेरीतील दोन दावेदार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-सुबोध सुरेश वैद्य, बीसीसीआय अधिकृत गुणलेखक (स्कोअरर)
आधीच्या भागात आपण सर्वसाधारण नियम व पध्दती जाणून घेतली. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की मालिकेतला विजय किंवा पराजय यावर मालिकेचा विजेता ठरत असतो कारण हि मालिका दोन संघांमध्ये खेळवली जात असते. किंबहुना काही वेळा तीन देशामध्येही मालिका खेळवल्याचे  आपल्याला माहीत आहेत. तसा प्रयोग याआधी झालेला आहे. प्रचलित साखळी पध्द्तीने खेळवण्यात तांत्रिक अडचणी तर होत्याच तसेच ही प्रत्यक्षात येणारी कल्पना नव्हती. सर्व सहभागी संघाना समपातळीवर घेऊन प्रत्येक संघ तुल्यबळ मानून सहा मालिका प्रत्येकाला खेळावयाच्या होत्या. किमान दोन ते कमाल पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार होती. प्रत्येक मालिकेत जास्तीतजास्त १२० गुणांची कमाई करण्याची संधी संघाना होती. मालिका विजय वा बरोबरी हेच काय ते उद्दिष्ट त्यांनी बाळगणे गरजेचे होते. 

WTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला!

कोविड महामारी मुळे काही मालिका होऊ शकल्या नाहीत किंवा प्रलिंबीत कराव्या लागल्या. मार्च २०२० मध्ये पाकिस्तान-बांगलादेश मधला दुसरा कसोटी सामना पुढे ढकलला. लागोलाग त्याच महिन्यात श्रीलंका-इंग्लड मालिका पुनर्निर्धारीत  करण्याची वेळ आली. लगेचच ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा तर वेस्टइंडीजचा इंग्लड दौरा पुढे ढकलला गेला. जून २०२० मध्ये बांगलादेश वि न्यूझीलंड यांच्यातली दोन कसोटी सामन्याची तर बांग्लादेश श्रीलंकेमधली तीन कसोटी सामन्यांची मालिका पुढे सरकवली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेस्टइंडीज दौरा आणि वेस्टइंडीज इंग्लड मालिका पुनर्नियोजित करण्यात आली. 

एकंदरीत ह्या सर्व अडचणीवर मात करत सरतेशेवटी भारत विरुध्द न्यूझीलंड असा अंतिम सामना १८ जून रोजी खेळवला जाणार आहे.

या आधी लिहिल्याप्रमाणे प्रत्येक मालिकेला १२० गुण कमावण्याची संधी संघाना होती. मालिका २, ३, ४ किंवा ५ कसोटी सामन्यांची असली तरी प्रत्येक कसोटी विजय वा पराजय/बरोबरी, त्याप्रमाणात गुण विभागणी झालेली. दोन सामन्यांची मालिका असेल तर प्रत्येक सामना ६० गुण प्राप्त करून देऊ शकतो. तर तीन सामनाच्या मालिकेत प्रत्येक सामना ४०, चार सामन्याच्या मालिकेतील प्रत्येक सामना ३० तर पाच सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामना २४ गुण कमावण्याची संधी उपलब्ध करून देतो. हे प्रमाण धरून पुढे जात आपण पाहूया की दोन सामन्याच्या मालितेतील प्रत्येक विजयासाठी किती गुण मिळतील. विजयासाठी ६० तर बरोबरी साठी ३० अनिर्णित सामन्यासाठी २० गुण. ह्याच प्रमाणे तिन, चार आणि पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला गुण विभागणी असणार होती. 
पुढील भागांत आपण अंतिम सामन्याचे प्रतिस्पर्धी भारत व न्यूझीलंड यांचा प्रवास आपण पाहूया.

Web Title: WTC Final 2021: how two team reach in WTC Final, know about point tally method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.