WPL (Women’s Premier League) च्या चौथ्या हंगामाच्या आधी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी पाच संघ रिटेन रिलीजच्या खेळानंतर मेगा लिलावात मजबूत संघ बांधणी करण्यासाठी उतरतील. WPL 2026 मेगा लिलावाचा मुहूर्त पक्का झाला आहे. इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कधी पार पडणार महिला खेळाडूंची मेगा लिलाव प्रक्रिया? कोणत्या फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये किती पैसा आहे? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं पार पडणार WPL 2026 मेगा लिलाव? किती खेळाडूंवर लागणार बोली?
WPL 2026 मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून हा एक दिवसाचा, अत्यंत हाय-एनर्जी इव्हेंट असेल. पाचही फ्रँचायझी आपापला संघ अधिक मजबूत करण्यासाठी मोठी बोलू लावून मजबूत संघ बांधणी करताना दिसतील. WPL च्या नियमानुसार, प्रत्येक फ्रँचायझीला १८ महिला खेळाडूंसह संघ बांधणी करायची आहे. मेगा लिलावासाठी एकूण ७३ स्लॉट उपलब्ध असून त्यापैकी २३ स्लॉट परदेशी खेळाडूंकरिता राखीव आहेत.
Kumar Sangakkara As RR Head Coach : संगकारानं घेतली द्रविडची जागा! कोण असेल RR चा कॅप्टन्सीचा चेहरा?
कोणत्या फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये किती रक्कम शिल्लक?
या मेगा लिलावासाठी यूपी वॉरियर्स (UP Warriorz) फ्रँचायझी संघाकडे सर्वाधिक १४.५ कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. त्यापाठोपाठ गुजरात जाएंट्स (Gujarat Giants) ९ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा संघ ६.१५ कोटी, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी (MI) ५.७५ कोटी तर दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals) ५. ७ कोटींच्या पर्ससह मेगा लिलावात उतरेल.
कुठं पाहता येईल मेगा लिलाव?
क्रिकेट चाहते जियो हॉटस्टार (JioHotstar) वर लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर देखील याचे थेट प्रेक्षपण करण्यात येईल.