Join us

स्नेह राणाचा 'बाणा'; दीप्तीच्या गोलंदाजीवर षटकार-चौकारांची 'बरसात', अन् सेट झाला नवा रेकॉर्ड

स्नेह राणाची तुफान फटकेबाजी, दीप्तीच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:29 IST

Open in App

महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामात युपी वॉरियर्स विरुद्धच्या लढतीत अखेरच्या षटकात स्नेह राणाने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. तिचा हा प्रयत्न आरसीबी संघाला यंदाच्या हंगामातील प्ले ऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवू शकला नाही. पण तिने एका षटकात कुटलेल्या धावांसह वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१९ व्या षटकात स्नेह राणाच्या भात्यातून षटकार-चौकारांची 'बरसात'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला अखेरच्या १२ चेंडूत ४३ धावांची आवश्यकता होती. आरसीबीच्या डावातील १९ व्या षटकात स्नेह राणा फलंदाजीसाठी मैदानात उतरली. तिने युपी संघाची कर्णधार दीप्तीच्या गोलंदाजीवर षटकार चौकारांची बरसात करत सामन्यात ट्विस्ट आणले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर ती कॅच आउट झाली अन् आरसबी संघाच्या प्ले ऑफमध्ये शर्यतीत टिकून राहण्याची आशा संपुष्टात आल्या.

दीप्तीच्या नावे लाजिरवाणा विक्रम, स्नेह राणानं एका षटकात कुटल्या सर्वाधिक धावा

आरसीबीच्या डावातील १९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव काढत किम गार्थ हिने स्नेह राणाला स्ट्राइक दिले. दिप्तीच्या दुसऱ्या चेंडूवर स्नेह राणानं कडक चौकार मारला. त्यानंतर दोन षटकार आणि चौकार मारत तिने मॅचध्ये ट्विस्ट निर्माण केले. या षटकातील पाचवा चेंडू नो बॉल असल्यामुळे आरसीबीला एक अंवातर चेंडू मिळाला. या चेंडूवरही तिने सिक्सर मारला. अखेरच्या षटकात सिंगल घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याऐवजी तिने मोठा फटका मारण्यावरच जोर दिला अन् ती कॅच आउट झाली. या षटकात दीप्तीनं २८ धावा खर्च केल्या. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. दुसरीकडे WPL मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्नेह राणाच्या नावे झाला.    WPL मध्ये एका षटकात फलंदाजाने केलेले सर्वाधिक धावा

  • २६ धावा - स्नेह राणा विरुद्ध दीप्ती शर्मा (आरसीबी विरुद्ध युपी) - लखनौ, २०२५ 
  • २४ धावा - सोफी डिवाइन विरुद्ध अ‍ॅश गार्डनर (आरसीबी विरुद्ध जीजी) - मुंबई , २०२३
  • २४ धावा - हरमनप्रीत कौर विरुद्ध स्नेह राणा (एमआय विरुद्ध जीजी) - दिल्ली, २०२४
  • २३ धावा - सोफी डिवाइन विरुद्ध तनुजा कंवर (आरसीबी विरुद्ध जीजी) - मुंबई, २०२३
  • २२ धावा - सोफिया डंकले विरुद्ध प्रीती बोस (जीजी विरुद्ध आरसीबी) - मुंबई सीसीआय, २०२३
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेट