कर्णधार अॅश्ले गार्डनर आणि डिएंड्रा डॉट्टीन यांच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर गुजरातने यंदाच्या डब्ल्यूपीएल स्पर्धेत आपल्या गुणांचे खाते उघडताना यूपी संघाचा ६ विकेट्स राखून केला. यूपीला २० षटकांत ९ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने १८ षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गार्डनरची फिफ्टी; डॉट्टीन-हरलीन जोडीनं केली तगडी बॅटिंग
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची २ बाद २ धावा अशी अवस्था झाली. मात्र, गार्डनरने ३२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. तिने लॉरा वुलवार्ड हिच्यासह तिसऱ्या बळीसाठी ५५ धावांची भागीदारी केली. डॉट्टीन आणि हरलीन देओल यांनी पाचव्या विकेसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजय निश्चित केला.
दिप्तीची झुंजार खेळी ठरली व्यर्थ
त्याआधी, उमा छेत्री आणि कर्णधार दीप्ती शर्मा यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर यूपीने समाधानकारक मजल मारली. प्रिया मिश्राने ३, तर डिएंड्रा डॉट्टीन आणि कर्णधार अॅश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. उमा आणि दीप्ती यांनी संघाला सावरताना ५१ धावांची भागीदारी केली. दीप्तीने २७ चेंडूंत ६ चौकारांसह ३९, तर उमाने २४ धावा केल्या.
धावफलक संक्षिप्त
यूपी : २० षटकांत २ बाद १४३ धावा (दीप्ती शर्मा ३९, उमा छेत्री २४; प्रिया मिश्रा ३/२५, डिएंड्रा डॉट्टीन २/३४, अॅश्ले गार्डनर २/३९) पराभूत वि.
गुजरात : १८ षटकांत ४ बाद १४४ धावा (अॅश्ले गार्डनर ५२, हरलीन देओल नाबाद ३४ डिएंड्रा डॉट्टीन नाबाद ३३; सोफी एक्लेस्टोन २/१६.)