Join us  

Worldcup 2011 : 97 धावांवर बाद झाल्याची खंत, धोनीच्या भूमिकेबद्दल गंभीरनं स्पष्टच सांगितलं

अंतिम सामन्यात शतकपूर्तीसाठी कमी पडलेले ते 3 तीन माझ्या लाईफमध्ये कायमची जाणीव करुन देतात. या सामन्यात धोनीने खूप आधार दिला, माझं शतक व्हावं अशी धोनीची इच्छा होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 3:10 PM

Open in App
ठळक मुद्देअंतिम सामन्यात शतकपूर्तीसाठी कमी पडलेले ते 3 तीन माझ्या लाईफमध्ये कायमची जाणीव करुन देतात. या सामन्यात धोनीने खूप आधार दिला, माझं शतक व्हावं अशी धोनीची इच्छा होती.

नवी दिल्ली - देशभरात आज टीम इंडियाच्या विश्वविजयाच्या 10 वर्षांचे सेलिब्रेशन करण्यात येत आहे. भारतीय संघाने जिंकलेल्या 2011 सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरची 97 धावांची खेळी अतिशय महत्वाची ठरली होती. तब्बल 28 वर्षांनंतर भारतानं वर्ल्डकप उंचावला आणि यात गंभीरचं योगदान मोलाचं ठरलं होतं. गेल्या 10 वर्षांपूर्वीच्या विश्वविजयाचा आठवणी गौतम गंभीरकडून जागविण्यात आल्या आहेत. स्टार स्पोर्टसाठी दिलेल्या मुलाखतीती गौतमने अंतिम सामन्यातील विजयाबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी, त्याने धोनीचं कौतुकही केलंय. 

अंतिम सामन्यात शतकपूर्तीसाठी कमी पडलेले ते 3 तीन रन माझ्या लाईफमध्ये कायमची जाणीव करुन देतात. या सामन्यात धोनीने खूप आधार दिला, माझं शतक व्हावं अशी धोनीची इच्छा होती. त्यासाठी, तो मला अधिक वेळ देत होता, तू टाईम घेऊन खेळ कर, गरज असेल तरच फटके मार, असेही धोनी म्हणाला होता. पण, दुर्दैवाने गौतम गंभीर 97 धावांवर बाद झाला आणि त्या कमी पडलेल्या 3 तीन धावांची खंत गौतमला आजही वाटते. पण, भारतीय संघाच विजय याचाच सर्वात मोठा आनंद असल्याचंही गौतम म्हणाला.    

आता पुढील विचार करावा

गंभीरनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काही थेट विधानं केली आहेत. "भारतानं वर्ल्डकप जिंकल्याची घटना ही काही कालची घटना नाहीय. त्याला आता १० वर्ष झाली आहेत. सारखं मागे वळून पाहणाऱ्यातला मी नाही. वर्ल्डकप जिंकणं नक्कीच गौरवास्पद गोष्ट होती. पण त्याला आपण कितीवेळ कवटाळून बसणार? आता पुढचा विचार करायला हवा", असं गंभीर म्हणाला.

तरच आपण क्रिकेटमध्ये सुपर पॉवर

गौतम गंभीरनं यावेळी सध्याच्या भारतीय संघाबाबतही विधान केलं. "आपण २०१५ आणि २०१९ सालचा वर्ल्डकप जिंकलो असतो तर नक्कीच आपण क्रिकेट विश्वातील सुपर पावर म्हणून ओळखले गेलो असतो. वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. त्यानंतर एकही वर्ल्डकप आपण जिंकलेलो नाही. त्यामुळे भूतकाळातील यशाबाबत आता मी उत्सुक नाही", असं गंभीर म्हणाला.

आम्ही कर्तव्य केलं, उपकार नाही

भारतीय संघातील खेळाडूंना गंभीरनं यावेळी अप्रत्यक्षरित्या टोला देखील लगावला. "वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मी ९७ धावा केल्या कारण मला धावा करण्यासाठीच निवडलं गेलं होतं. जहीर खानचं काम होतं विकेट्स घेणं. आम्हाला आमचं काम चोख करायचं होतं. २ एप्रिल रोजी जे काही आम्ही केलं ते काही कुणावर उपकार करण्यासाठी केलं नाही", असं रोखठोक विधान गंभीरनं केलं आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघश्रीलंका