दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी विश्व सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि विश्वविजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरुवात होणार आहे.
इंग्लंडचा संघ आयर्लंडविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाºया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ अशा आठ संघांना विश्वचषक स्पर्धेत थेट स्थान मिळेल.
आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले १२ संघ आणि विश्व क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ चे विजेते नेदरलॅन्डस् असे १३ संघ या नव्या सुपर लीगमध्ये स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात ४-४ वन डे मालिका खेळेल. प्रत्येक वन डे मालिका ही तीन सामन्यांचीच असेल. या स्पर्धेत जे संघ थेट पात्र ठरणार नाही, त्यांना पात्रता फेरी २०२३ मध्ये पाच सहकारी संघांसह खेळून स्थान निश्चित करावे लागेल. यातून दोन संघ निवडले जातील आणि भारतात १० संघांमध्ये मूळ विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल. (वृत्तसंस्था)
प्रत्येक संघाला ४-४ मालिका (होम अॅण्ड अवे) खेळाव्या लागतील
प्रत्येक मालिकेत ३-३ सामने असतील विजयी संघाला मिळतील १० गुण
सामना अनिर्णीत किंवा रद्द
झाल्यास पाच गुण
पराभवासाठी कुठलाही गुण नाही
आठ मालिकेतील कामगिरीच्या
आधारे ठरेल संघांची क्रमवारी
सुपर लीगची सुरुवात
३० जुलैपासून
एकण १३ संघ, त्यातील १२ पूर्ण सदस्य संघ, १३ वा संघ नेदरलँड
सात संघ गाठतील पात्रता यजमान भारताला थेट प्रवेश
पाच संघ ठरतील थेट पात्र
अन्य दोन संघ पात्रता गाठून येतील