Join us  

अन् स्टीव्ह स्मिथनं बायको ऐवजी केलं दुसरीलाच टॅग, नेटीझन्सने उडवली खिल्ली

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सोशल मीडियावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथनं ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याने बायकोसोबतचा फोटो पोस्ट केला होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 3:33 PM

Open in App

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेसोशल मीडियावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथनं ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो होता. पण त्यानं टॅग करताना बायकोला न करता दुसऱ्याच महिलेला चुकून टॅग केलं. आणि त्याला नेटीझन्सनी ट्रोल केलं आहे. 

स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रॅडस्लॅम स्पर्धेत एक सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली होती. त्याने याचे सोशल मीडियावर अनेक फोटोही शेयर केले आहे. रॉजर फेडरर आणि जोकोविच यांच्या सामन्यांनाही हजेरी लावली. ऑस्ट्रेलियन ओपनमधील फेडरर विरुद्ध मार्तोन फुकडोविकस सामन्याला स्टिव्ह स्मिथने हजेरी लावली होती. स्मीथ हा फेडररचा मोठा चाहता आहे. त्याने रॉजर फेडररबरोबर एक खास फोटोही शेअर केला. काल झालेल्या सामन्यात फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्यानं ट्विट करत त्याचे अभिनंदनही केलं आहे. 

22 जानेवारी रोजी स्मीथनं पत्नीसोबतचा एक खास फोटोही शेअर केला होता. हे करताना त्याने एक चूक केली. त्याने ट्विटरवर बायको डॅनी विल्स हिला चुकीचं टॅग केल आहे. यामुळे स्मिथला ट्विटरवर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. स्मिथने @DaniWillis91 असे टॅग करण्याऐवजी @dani_willis असे टॅग केले आहे. 

स्मिथच्या नेतृत्वाखाली नुकतेच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिका जिंकली होती मात्र त्यानंतर चालू झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिले तीनही सामन्यात पराभव स्वीकारला आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला यावर्षी सर्वोत्तम कसोटीपटूचाही पुरस्कार मिळाला आहे. इंग्लडविरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी स्मीथला आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेमुळं त्याला आराम दिल्याचे ऑस्ट्रेलियनं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं स्मीथच्या अनुपस्थितीत वॉर्नर संघाचे नेतृत्व करणार आहे. 

या चुकीच्या टॅगमुळे स्टिव्हला मात्र चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले. काहींनी तर त्याला बेंगलोर कसोटीमधील ब्रेनफेडची आठवण करून दिली. 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाऑस्ट्रेलियन ओपनस्टीव्हन स्मिथसोशल मीडिया