विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट

युवीनं शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:14 IST2024-11-05T13:13:41+5:302024-11-05T13:14:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
World Looks Forward To Your Comeback Yuvraj Singh Shares Powerful Birthday Wish For Virat Kohli | विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट

विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट

क्रिकेट जगतातील किंग विराट कोहली ५ नोव्हेंबरला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. बर्थडे दिवशी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. भारताचा माजी क्रिकेटर आणि दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू युवराज सिंग याने खास व्हिडिओ शेअर करत विराट कोहलीला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

विराट कोहलीसाठी युवीनं शेअर केला खास व्हिडिओ 



 विराट कोहली नेहमीप्रमाणे दमदार कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त करत युवीनं मजेदार व्हिडिओसह कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.  शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युवी हातात शूज घेऊन  कोहलीला कॉल करतानाचा सीन क्रिएट करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला कोहलीचाही असाच अतरंगी अंदाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. दोघांच्यातील विनोदी संवादाने व्हिडिओची सुरुवात होते. पण त्यानंतर  या व्हिडिओत कोहलीचा रुद्र अवतारही पाहायला मिळतो. 

प्रेरणादायी संदेशासह कमबॅकसाठीही दिल्या शुभेच्छा

युवराज सिंगनं शेअर कोहलीसाठी जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात फनी अंदाज पाहायला मिळत असला तरी कॅप्शनमध्ये युवीनं स्टार क्रिकेटर किंग कोहलीसाठी प्रेरणादायी संदेशही दिला आहे. युवीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, किंग कोहली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अपयशानंतर सर्वात भारी कमबॅक समोर येते. संपूर्ण जग तुझ्या दमदार कमबॅकची आतूरतेनं वाट पाहत आहे. याआधीही तू  ते करून दाखवलं आहेत. पुन्हा ते पाहायला मिळेल, असा संदेश देत युवीनं कोहलीला बर्थडेसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही शुभेच्छा दिल्याचे दिसते. 

युवी-विराच दोघांमध्ये आहे कमालीची बॉन्डिंग


युवराज सिंग हा विराट कोहलीचा  सिनियर असला तरी दोघांच्यात एक कमालीची बॉन्डिंग आहे. वेळोवेळी त्याची झलक चाहत्यांना पाहायलाही मिळाली आहे. टीम इंडियाकडून बरीच वर्षे एकत्र खेळल्यानंतर फिल्डबाहेरही त्यांच्यातील खास मैत्रीची झलक पाहायला मिळत असते. युवीच्या घरी कार्यक्रम असो वा एखादी पार्टी दोघे पंजाबी गाण्यावर ठेका धरतानाही दिसून आले आहे. 

Web Title: World Looks Forward To Your Comeback Yuvraj Singh Shares Powerful Birthday Wish For Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.