Join us

पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का; कर्णधारसह दोन खेळाडूंचा अपघात 

येत्या १८ एप्रिलपासून पाकिस्तानी महिला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 17:08 IST

Open in App

Pakistan Womens Cricket : येत्या १८ एप्रिलपासून पाकिस्तानी महिला संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे.  त्यानंतर या दोन्ही संघामध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच पीसीबीच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारासमवेत दोन खेळाडूंच्या गाडीचा अपघात झाला आहे. 

५ एप्रिलच्या दिवशी सांयकाळी या खेळाडूंचा अपघात घडला. पीसीबीने याबाबत माहिती देत खुलासा केला.त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. या अपघातामध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफ आणि गोलंदाज गुलाम फात्मा हिचा समावेश आहे. सध्या या खेळाडूंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.

दरम्यान, पीसीबीच्या देखरेखीखाली या खेळाडूंवर उपचार सुरू आहेत. वेस्ट इंडिजचा महिला क्रिकेट संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. या महिला क्रिकेटर्सच्या आपघातामुळे वेस्ट इंडिजच्या संघाचं आव्हान पेलणं पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी जिकरीचं काम असणार आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानआयसीसी