WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं अस काय घडलं? त्यासंदर्भातील खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:37 IST2025-07-19T14:33:52+5:302025-07-19T14:37:22+5:30

whatsapp join usJoin us
World Championship of Legends 2025 Pakistan Champions vs England Champions 1st Match Kamran Akmal Miss Stumping And Umar Amin Gets Run Out After Mohammad Hafeez Video Goes Viral | WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Championship of Legends 2025, Pakistan Champions vs England Champions 1st Match : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यासह लीजेड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेची सुरुवात झालीये. पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडच्या संघाला शह देत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पण  बॅटिंग आणि फिल्डिंग वेळी झालेल्या गडबड घोटाळ्यामुळे पाक संघाची चांगलीच फजिती झालीये. इथं जाणून घेऊयात मैदानात नेमकं अस काय घडलं? त्यासंदर्भातील खास गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

तो कॅच घेतो की, दुवाँ मागतो तेच कळत नाही

पाकिस्तान संघातील विकेट किपर बॅटर कामरान अकमल हा विकेटमागील खराब कामगिरीमुळे अनेकदा ट्रोल झाला आहे. शोएब अख्तरनं कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या सवंगड्याला टोलाही हाणल्याचे पाहायला मिळाले होते. तो विकेटमागे कॅच घेतो की, दुवाँ मागतो तेच मला कळत नाही, असं अख्तर म्हणाला होता. आता लीजेंड्स लीग स्पर्धेतील गचाळ क्षेत्ररक्षणामुळे कामरान अकमल चर्चेत आलाय.

मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड

फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा, बॅटर अर्ध्या पिचवर गेला तरी आउट नाही झाला

लीजेंड्स लीग टी-२० स्पर्धेतील इंग्लंडच्या डावातील सहाव्या षटकात पाकिस्तानकडून शोएब मलिक गोलंदाजी करत होता. या षटकात इंग्लंडचा बॅटर फिल मस्टर्ड याने पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो चुकला पण कामरान अकमल विकेट किपर असल्यामुळे शोएब मलिकच्या जाळ्यात काही फसला नाही. टप्पा पडल्यावर चेंडू कुठं गेला ते पाक विकेट किपरला कळलेच नाही. तोपर्यंत अर्ध्या पिचपर्यंत जाऊन बॅटर पुन्हा क्रिजमध्ये पोहचला होता. कामरन अकमलनं स्टंपिग मिस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय.

बॅटिंग वेळीही झाली गंमत, ताळमेळाचा अभाव अन् दोन्ही बॅटर एकाच क्रिजमध्ये

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी वेळीही पाकिस्तानी बॅटर्समध्ये ताळमेळाचा अभाव दिसून आले. पाकच्या डावातील आठव्या षटकात मोहम्मद हाफिजनं विकेटमागे चेंडू टोलावल्यावर नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या उमर अमीनला चोरटी धाव घेण्यासाठी कॉल केला. तो क्रिजमध्ये पोहचला तरी मोहम्मद हाफिज चेंडूकडे बघत राहिला. दोन्ही बॅटर एकाच क्रिजमध्ये आले अन् इंग्लंडनं रन आउटच्या रुपात अमीनचा खेळ खल्लास केला. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी पाकच्या संघाला ट्रोल करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: World Championship of Legends 2025 Pakistan Champions vs England Champions 1st Match Kamran Akmal Miss Stumping And Umar Amin Gets Run Out After Mohammad Hafeez Video Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.