Join us

वर्ल्ड चॅम्पियन यश धुलचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, पदार्पणातच ठोकलं शतक, केली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी 

Yash Dhull News: नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:08 IST

Open in App

गुवाहाटी - नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा रद्द करावी लागली होती. मात्र यावेळी काही बदलांसह ही स्पर्धात होत आहे.दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या लढतीमधून यश धुलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत तामिळनाडूच्या गोलांदाजंची धुलाई केली. त्याने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याबरोबरच यश धुलने रणजी करंडक स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरसह काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अखेरीस ११३ धावा काढून यश बाद झाला. 

टॅग्स :रणजी करंडकभारतीय क्रिकेट संघ
Open in App