वर्ल्ड चॅम्पियन यश धुलचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, पदार्पणातच ठोकलं शतक, केली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी 

Yash Dhull News: नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:08 IST2022-02-17T14:05:25+5:302022-02-17T14:08:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
World champion Caption Yash Dhull' scoring a century in his debut in Ranji Trophy | वर्ल्ड चॅम्पियन यश धुलचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, पदार्पणातच ठोकलं शतक, केली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी 

वर्ल्ड चॅम्पियन यश धुलचा रणजी ट्रॉफीमध्ये धमाका, पदार्पणातच ठोकलं शतक, केली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी 

गुवाहाटी - नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत यश धुलने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता यश धुलने रणजी करंडक स्पर्धेतही मोठा धमाका केला असून, यशने दिल्लीकडून पदार्पण करताना पदार्पणातच शतकी खेळी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धा रद्द करावी लागली होती. मात्र यावेळी काही बदलांसह ही स्पर्धात होत आहे.दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या लढतीमधून यश धुलने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत तामिळनाडूच्या गोलांदाजंची धुलाई केली. त्याने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याबरोबरच यश धुलने रणजी करंडक स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरसह काही मोजक्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले. अखेरीस ११३ धावा काढून यश बाद झाला. 

Web Title: World champion Caption Yash Dhull' scoring a century in his debut in Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.