भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुवाहटीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यासह महिला वनडे क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या मॅचआधी होणाऱ्या ओपनिंग सेरेमनीत लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने रंग भरला. पण त्याआधी तिने थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाहीतर मॅच आधी ड्रेसिंग रुममध्ये सुरांची मैफिल रंगली. भारतीय महिला संघातील खेळाडूंनीही तिच्या सुरात सूर मिसळत माहोल निर्माण केला. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील हा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृती मानधना निघाली श्रेया घोषालची मोठी चाहती
BCCI नं सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रेसिंग रुममधील खास क्षण दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय महिला संघाचे कोच अमोल मजुमदार हे श्रेया घोषाल हिचे स्वागत करताना दिसतात. टीम इंडियाची उप कर्णधार स्मृती मानधना ही श्रेया घोषालची मोठी चाहती निघाली. वनडेतील क्वीननं ते थेट श्रेया घोषालसमोर बोलूनही दाखवलं. त्यानंतर जेमिमा हिने राधा यादव गायिकेला आदर्श मानते. त्यामुळे ती या भेटीसाठी खूप उत्सुक होती, ही गोष्ट सांगताना दिसते.
ICC Women's World Cup 2025 : स्मृतीशिवाय यंदाच्या हंगामात या ७ जणींवर असतील सर्वांच्या नजरा
खास गाण्याची फरमाइश
या खास भेटीत टीम इंडियातील खेळाडूंनी श्रेया घोषाल हिच्याकडे 'पियू बोले' या गाण्याची फरमाइश केली. मग मॅच आणि ओपनिंग सेरेमनीत रंग भरण्याआधी श्रेयानं खेळाडूंची डिमांड लगेच पूर्ण केली. तिच्या मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या आवाजात खेळाडूंचा आवाज मिसळला. गायिकेसोबत खेळाडूंनी हे लोकप्रिय गाणं गायले अन् सलामीच्या लढतीआधी ड्रेसिंगरुमध्ये हलके फुलके वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.