Join us  

ICC Womens T20 World Cup : महिला टी२० विश्वचषक आजपासून; भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी

ICC Womens T20 World Cup : महिला टी२० विश्वचषक आजपासून; आघाडीच्या फलंदाजांवर मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 2:40 AM

Open in App

सिडनी: प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० विश्वचषकाच्या सलामीला शुक्रवारी यजमान ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात येत असलेले अपयश ही भारताची कमकुवत बाजू आहे. भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकलाही, मात्र अंतिम सामना भारताने गमावला. सहापैकी चार वेळा विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकविले आहे.

येथे बाद फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत करायचे असेल तर भारताच्या मधल्या आणि तळाच्या फळीला चांगला खेळ दाखवावाच लागेल. त्याचवेळी भारताची मुख्य मदार आघाडीच्या फलंदाजांवर असेल. गेल्या काही सामन्यांत आघाडीच्या फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखला आलेले नाही. मधली फळी वारंवार न कोसळण्याची काळजी संघ व्यवस्थापनाला घ्यावी लागेल.

युवा शेफाली वर्माकडून भारताला बऱ्याच अपेक्षा आहेत. याशिवाय सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत कौरकडूनही आशा आहेत. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात खेळलेली रिचा घोष हिला पुन्हा संधी मिळणार का, हे पहावे लागेल.गोलंदाजीत भारत फिरकीपटूंवर विसंबून आहे. संघात चांगले वेगवान गोलंदाज नाहीत. अशावेळी शिखा पांडेच्या फिरकीकडून बºयाच आशा असतील. मागच्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता.२०१८ सालचा टी२० विश्वचषक आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आमची कामगिरी आणि फलंदाजी सुधारली आहे. दुसरीकडे पहिल्या सहा षटकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना स्थिरावू द्यायचे नाही, या डावपेचानुसार आम्ही खेळणार आहोत. - डब्ल्यू व्ही. रमण, प्रशिक्षक, भारतसामना: दुपारी १.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, शेफाली वर्मा, पूनम यादव आणि राधा यादव.ऑस्ट्रेलिया : मेग लॅंिनग (कर्णधार), एरिन बर्न्स, निकोला कारे, अ‍ॅश्ले गार्डनर, रशेल हॅन्स, एलिसा हीली, जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी एम, बेथ मूनी, एलिस पैरी, मेगान शट, अन्नाबेल सदरलॅन्ड, मोली स्ट्रानो, जॉर्जिया वेयरहॅम.‘ऑस्ट्रेलिया दावेदार, पण भारत कमुकवत नाही’‘आयसीसी टी२० महिला विश्वचषकाच्या सलामी लढतीत यजमान ऑस्ट्रेलिया संघ विजयाचा प्रबळ दावेदार असला तरी भारतीय संघ कमकुवत नाही. सामन्यात भरपूर धावा निघतील आणि रोमहर्षक निकाल लागेल,’ असा विश्वास अनुभवी खेळाडू मिताली राज हिने व्यक्त केली आहे.

आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात मिताली म्हणाली, ‘दोन्ही संघात अनेक गुणवान खेळाडू असल्याने भरपूर धावा निघतील. सामन्याचा शेवट रोमहर्षक निकालाद्वारे होईल. फलंदाजांच्या कामगिरीवर निकाल अवलंबून असेल. भारताविरुद्ध यजमानांचे पारडे जड वाटते.’च्मितालीने १९९९ ला खेळणे सुरू केले. त्यावेळी महिला क्रिकेट लोकप्रिय नव्हते. मिताली म्हणाली,‘ आमच्यावेळी पुरुष खेळाडू हेच आमची प्रेरणा असायचे. टीव्हीवर त्यांना खेळताना पाहायला मिळायचे. आज मात्र युवा महिला, खेळाडूंची आदर्श ठरू शकते, हा माझ्यामते सर्वांत मोठा बदल आहे.’

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट