Women's Cricket World Cup 2025 Know History And Interesting Facts : भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली १३ व्या हंगामातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपासून भारत-श्रीलंका यांच्यातील गुवाहटीच्या मैदानातील लढतीनं या जागतिक स्तरावरील स्पर्धेला सुरुवात होतीये. या स्पर्धेतील अंतिम सामना हा २ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार असून महिला क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार की, ज्यांनी आतापर्यंत दबदबा दाखवून दिलाय तेच मैदान गाजवणार? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेतील क्वीन स्मृतीसह अख्ख्या हरमनप्रीत ब्रिगेडवर असतील भारतीयांच्या नजरा
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंतच्या १२ हंगामात फक्त तीन वेगवेगळे विजेते मिळाले आहेत. यात ऑस्ट्रेलियन महिला संघ सर्वाधिक ७ वेळा चॅम्पियन ठरल्याचा रेकॉर्ड आहे. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड महिला ४ वेळा मिळवलेल्या जेतेपदासह दुसऱ्या स्थानावर आहेत. याशिवाय न्यूझीलंडच्या महिला संघाने एकदा ही स्पर्धा गाजवली आहे. वनडेतील क्वीन स्मृती मानधनाच्या साथीनं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळी घरच्या मैदानात ICC ची पहिली ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरले.
ड्रेसिंग रुममध्येही या गोष्टींची चर्चा करत नाही; IND vs PAK मॅचबद्दल काय म्हणाली हरमनप्रीत?
पण तुम्हाला माहितीये का? पुरुषांआधी महिलांनी खेळलीये वर्ल्ड कप स्पर्धा
यंदाच्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ICC नं काही ऐतिहासिक निर्णय घेतले. यात बक्षीसाच्या रक्कमेत केलेली भरघोस वाढ अन् महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांसाठी फक्त १०० रुपयांत तिकीट उपलब्ध करून देण्याच्या समावेश आहे. पण तुम्हाला माहितीये का? सध्याच्या घडीला पुरुषांच्या क्रिकेटला अधिक लोकप्रियता मिळतीये, पण पुरुषांआधी महिलांनी वर्ल्ड कप स्पर्धा खेळली आहे. एवढेच नाही तर भारतात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेसह दोन वेळा फायनलशिवाय विजेता ठरवण्यात आला होता.
'लेडीज फर्स्ट', जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील खास गोष्ट
१९९७५ पासून इंग्लंडच्या मैदानातून पुरुष वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजनं सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकली. १९८३ मध्ये कपिल पाजींच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तगड्या कॅरेबियन ताफ्याची हॅटट्रिक रोखत भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला, हा इतिहास जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का? पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेच्या दोन वर्षे आधी इंग्लंडच्या मैदानात महिला क्रिकेटमधील वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात आली होती.
दुसरा हंगाम भारतात; फायनलशिवाय ठरलेला वर्ल्ड चॅम्पियन
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला हंगाम यजमान इंग्लंड महिला संघाने गाजवला होता. या हंगामात भारतीय महिला संघाचा सहभाग नव्हता. पण १९७८ मध्ये दुसऱ्या हंगामातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही भारताच्या यजमानपदाखाली झाली. विशेष म्हणजे या दोन्ही हंगामात फायनलशिवाय वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता. कारण त्यावेळी या स्पर्धेतील सामने हे राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये (प्रत्येक संघ प्रत्येकासोबत खेळला) खेळवण्यात आले होते. सर्वाधिक गुणांच्या जोरावर आधी इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.
१९७३ – इंग्लंडमध्ये महिला वर्ल्ड कप, विजेता इंग्लंड
१९७८ – भारतात दुसरा महिला वर्ल्ड कप, विजेता ऑस्ट्रेलिया (भारतीय संघ चौथ्या स्थानावर सर्वात तळाला)