Join us

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये महिला अंपायर, पाहा हा व्हिडीओ

आयसीसीने याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 18:43 IST

Open in App

नवी दिल्ली : आतापर्यंत महिलांच्या सामन्यांमध्ये तुम्ही पुरुष पंचा पाहिले असतील, पण पुरुषांच्या मॅचमध्ये महिला अंपायर नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या क्लेयर पोलोसाक यांनी ही गोष्ट बदलून दाखवली आहे. आज नामिबिया आणि ओमान यांच्यातील पुरुषांच्या सामन्यात क्लेयर यांनी पंचगिरी केल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने याबाबतचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

 क्लेयर या 31 वर्षांच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांच्या 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. 2016 साली झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून क्लेयर यांनी पंचगिरीला सुरुवात केली होती. आयसीसीच्या सामन्यांमध्ये क्लेयरकडून आतापर्यंत चांगली पंचगिरी पाहायला मिळाली आहे.

टॅग्स :आयसीसी