Join us  

... न खेळताही स्टीव्हन स्मिथ ठरतोय विराटपेक्षा अव्वल

दोन महिन्यांपासून स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरलेला नाही. पण तरीही अजूनही त्याला कुणीही मागे टाकू शकलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:58 PM

Open in App
ठळक मुद्देसध्याच्या घडीला स्मिथच्या खात्यामध्ये 929 गुण आहेत आणि त्यामुळेच त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे.

दुबई : चेंडूशी छेडछाड केल्यानंतर आता जवळपास दोन महिने होऊन गेले. या गैरकृत्यामुळे स्टीव्हन स्मिथवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरलेला नाही. पण तरीही अजूनही त्याला कुणीही मागे टाकू शकलेलं नाही. कारण अजूनही आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत स्मिथ अव्वल असून भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही त्याला मागे टाकता आलेले नाही.

आयसीसीने काही मिनिटांपूर्वीच कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत स्मिथने अव्वल स्थान कायम राखले आहे. सध्याच्या घडीला स्मिथच्या खात्यामध्ये 929 गुण आहेत आणि त्यामुळेच त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीही या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराटच्या खात्यामध्ये सध्याच्या घडीला 912 गुण आहेत. या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा जो रुट आहे, त्याच्या खात्यात 855 गुण जमा आहेत. त्यामुळे जर इंग्लंड दौऱ्यात कोहलीने दमदार फलंदाजी केली तरंच तो स्मिथला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावू शकतो.

कसोटी क्रमवारीत भारत 125 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे संघ असून त्यांच्या खात्यात 112 गुण आहेत. या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 106 गुण कमावले आहेत.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथचेंडूशी छेडछाडआयसीसीआॅस्ट्रेलियाविराट कोहली