दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत फलंदाजाने जबरदस्त शॉट खेळला आणि एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावर अम्पायरने एकच धाव दिली. अम्पायरने आधी हा चेंडू नो बॉल दिला होता आणि नंतर डेड बॉलचे संकेत दिले. हा सर्व प्रकार दुबईत खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० मध्ये घडला. डेझर्ट वायपर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जात होता. सामन्यात शारजाह वॉरियर्सच्या कोलमार कॉडमारने चौकार मारला आणि चेंडू नो-बॉल होता, तरीही फक्त एक धाव मिळाली.
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मॅचच्या पाचव्या षटकाचा पाचवा बॉल वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने चुकवला. यावर, कॉडमर जवळजवळ खेळपट्टीच्या बाहेर धावत आला आणि एक भन्नाट शॉट खेळला. शॉट इतका जोरदार होता की एक टप्पा खात तो सीमारेषेबाहेर गेला. यावेळी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करत होता, तो म्हणाला की त्यांच्या काळात असे चेंडू भेट म्हणून मिळाले असते तर... 
अम्पायरनी प्रथम हा चेंडू नो बॉल दिला आणि नंतर डेड बॉलचे संकेत दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. संघाला पाच धावा मिळायला हव्या होत्या, परंतु त्या चेंडूवर फक्त एक धाव मिळाली. मेरीलेबोन क्रिकेट क्लब अर्थात MCC च्या नियम २१.८ नुसार, जर फलंदाजाला चेंडूवर शॉट खेळण्यासाठी खेळपट्टीबाहेर जावे लागले, तर मैदानी पंच प्रथम नो बॉलचा संकेत देईल. यानंतर तो लगेच त्याला डेडबॉल म्हणेल. असाच काहीसा प्रकार इथेही पाहायला मिळाला. 
वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलने हा विचित्र चेंडू टाकला, परंतु त्याचा संघ व्हायपर्सने हा सामना जिंकला. वॉरियस्ने ५ बाद १४५ धावा केल्या. 
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"