नवी दिल्ली: आठपैकी पाच सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा विजयी‘ जोश’ रोखण्याचे अवघड आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स गुरुवारी फिरोजशाह कोटला मैदानावर उतरेल. विशवचषकात स्थान मिळवू न शकलेला रिषभ पंत आणि जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानला जाणारा कासिगो रबाडा यांच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.निवडकर्त्यांनी विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात दिनेश कार्तिकला प्राधान्य दिल्याने पंत दोन दिवसांपासून नर्व्हस आहे. याआधी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंतने २७ चेंडूत ७८ धावांचा धडाका करताच दिल्लीने ३७ धावांनी सरशी साधली होती. आता मुंबईच्या गोलंदाजांपुढे पंत, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांना रोखण्याचे आव्हान असेल, तर फलंदाजांपुढे रबाडाचा तुफानी मारा कसा खेळावा, हा प्रश्न असेल. दिल्लीच्या पाचही विजयात रबाडाचे मोठे योगदान राहिले. द. आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाचे १७ बळी झाले असून सहकारी ख्रिस मॉरिस याने ११ गडी बाद करीत त्याला समर्थ साथ दिली आहे. रबाडाने २१ धावात मुंबईचे चार गडी बाद केले होते. केकेआरविरुद्ध सुपरओव्हरमध्ये तो गेमचेंजर ठरला, तर आरसीबी आणि हैैदराबादविरुद्ध त्याने प्रत्येकी चार गडी बाद केले.मुंबईने मागच्या सामन्यात आरसीबीला नमवून पराभवानंतर विजयाची चव चाखली. चाहत्यांना रोहितविरुद्ध रबाडा असा संघर्ष पहायला मिळणार असला तरी क्विंटन डिकॉक व हार्दिक पांड्या यांच्याकडे नजरा असतील. एकीकडे दिल्लीने मागील तीन सामने जिंकले, तर मुंबईला विजयी लय कायम राखण्यात अपयश आले. दिल्लीविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास किएरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग यांना मोठी खेळी करावी लागेल. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई इंडियन्स दिल्लीचा ‘जोश’ रोेखणार?
मुंबई इंडियन्स दिल्लीचा ‘जोश’ रोेखणार?
आठपैकी पाच सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा विजयी‘ जोश’ रोखण्याचे अवघड आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स गुरुवारी फिरोजशाह कोटला मैदानावर उतरेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:39 IST