Join us  

Will Jacks : १८ चेंडूंत ८८ धावा! विल जॅक्सचं The Hundred मध्ये जलद शतक; Mumbai Indiansच्या खेळाडूचा मोडला विक्रम  

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला अवघ्या ४ दिवसांत दुसरा शतकवीर मिळाला. विल स्मीद ( Will Smeed) नंतर विल जॅक्सने ( Will Jacks) शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 4:32 PM

Open in App

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला अवघ्या ४ दिवसांत दुसरा शतकवीर मिळाला. विल स्मीद ( Will Smeed) नंतर विल जॅक्सने ( Will Jacks) शतकी खेळी केली. पण, त्याचं हे शतक The Hundred लीगमधील सर्वात जलद शतक ठरले आणि त्याने मुंबई इंडियन्सच्या नव्या फ्रँचायझीच्या ताफ्यातील विल स्मीदचा विक्रम मोडला. साउदर्न ब्रेव्ह विरुद्ध ओव्हल इनव्हिजिबल ( OVAL INVINCIBLES ) यांच्यातल्या सामन्यात विल जॅक्सने ही वादळी खेळी केली. संघाच्या एकूण लक्ष्याच्या ७६ टक्क्याहून अधिक धावा या जॅक्सने करताना नवा विक्रम नावावर केला. 

Kieron Pollard, ड्वेन ब्राव्हो व निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार; MI Emirates ने जाहीर केला १४ खेळाडूंचा संघ आज झालेल्या सामन्यात जॅक्सने तुफान फटकेबाजी केली. ब्रेव्हने विजयासाठी १३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्याकडून मार्कस स्टॉयनिसने ३७, टीम डेव्हिडने २२ धावा केल्या. रिसे टॉप्लीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ओव्हल संघाने ८२ चेंडूंत हे आव्हान पार करताना ३ बाद १४२ धावा केल्या. यापैकी १०८ धावा या जॅक्सच्याच होत्या. जॅक्सने नाबाद १०८ धावांसाठी ४८ चेंडू खेळले. त्यात १० चौकार व ८ षटकार अशा ८८ धावा या १८ चेंडूंत कुटल्या. 

ट्वेंटी-२०  क्रिकेटमध्ये ( पुरुष) संघाच्या एकूण धावांपैकी एका खेळाडूचा सर्वाधिक वाटा उचलण्याचा विक्रम जॅक्सने नावावर केला. त्याने दी हंड्रेड लीगमध्ये जलद शतक झळकाताना ओव्हलच्या एकूण धावांमध्ये ७६.०५ टक्के धावा केल्या. यापूर्वी ऑसींच्या आरोन फिंचने ( ७५.१० टक्के) २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २ बाद २२९ धावांपैकी १७२ धावा स्वतः केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करतानाची दी हंड्रेड लीगमधील जॅक्सची ही खेळी सर्वोत्तम ठरली. त्याने डेवीड मलानचा नाबाद ९८ धावांचा विक्रम मोडला.   मागील आठवड्यात बर्मिंगहॅम फोनिक्स ( Birmingham Phoenix) विरुद्ध साउदर्न ब्रेव्ह ( Southern Brave) यांच्यातल्या सामन्यात २० वर्षीय विल स्मीदने या लीगमधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावताना साउदर्न ब्रेव्ह संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ५० चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या.त्याला मुंबई इंडियन्सने त्यांच्या UAE लीगमधील संघासाठी करारबद्ध केले आहे. MI Emirates असे मुंबई इंडियन्सच्या UAE लीगमधील संघाचे नाव आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सटी-20 क्रिकेट
Open in App