ICC T20 WC, West Indies vs South Africa, 47th Match, Super 8 Group 1 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतल ज्या मैदानात मोठ्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली त्याच मैदानातून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सूर्या ब्रिगेडला दिलासा देणारा संकेत दिला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ फेरीतील सामना रंगला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर टीम इंडियाचं समीचं सेमीकरण सोपे होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही लढतही उर्वरित दोन सामन्या इतकीच महत्त्वपूर्ण झाली आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आधी नाणेफेकीचा कौल भारतीय संघ आणि चाहत्यांच्या मनाजोगा लागला, मग...
या सामन्यात नाणेफेकीचा कौल लाखो भारतीयांच्या बाजूनं लागला. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आणि परिस्थितीनुसार त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने पहिल्याच षटकात पॉवर हिटिंग शो दाखवून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना १७ धावा काढल्या. पण हा शो फार काळ टिकला नाही. रबाडा आला अन् त्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या संघालाच नव्हे तर चेन्नईच्या मैदानता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याची तयारी करणाऱ्या टीम इंडियालाही मोठा दिलासा दिला.
रबाडानं एकाच षटकात दोघांना दाखवला तंबूचा रस्ता
ब्रँडन किंग आणि शई होप जोडीनं पहिल्या षटकात १७ धावा कुटल्या. पण रबाजाने डावातील तिसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शई होपला क्विंटन डिकॉक करवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलाला शिमरॉन हेटमायरला त्याने पुढच्याच चेंडूत फसवले होते. पण कॉर्बिन बॉशनं त्याचा झेल सोडला. पण या संधीच तो सोन करू शकला नाही याच षटकात रबाडाने शिमरॉन हेटमायरलाही माघारी धाडले.
मग पिक्चरमध्ये आला लुंगी एनिग्डी अन्...
लुंगी एनिग्डीनं ब्रँडन किंगला ११ चेंडूत २१ धावांवर आपल्या जाळ्यात अडकवले. रोस्टन चेजच्या रुपात त्याने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला. रॉव्हमन पॉवेलच्या रुपात त्याने तिसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. कॉर्बिन बॉशनंही दमदार गोलंदाजी करताना दोन विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील तिघांच्या माऱ्यासमोर पॉवर हिटर फ्लॉप ठरल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने ८३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं फिरला आहे. ही गोष्ट टीम इंडियासाठी सेमीचा मार्ग सोप करण्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
Web Summary : South Africa's win against West Indies offers India a sigh of relief in the T20 World Cup. After a powerful start, West Indies lost quick wickets, thanks to Rabada and Ngidi's crucial breakthroughs. This win simplifies India's समीकरण for the semi-finals.
Web Summary : दक्षिण अफ्रीका की वेस्ट इंडीज पर जीत से भारत को टी20 विश्व कप में राहत मिली। शक्तिशाली शुरुआत के बाद, रबाडा और न्गिडी की महत्वपूर्ण सफलता के कारण वेस्ट इंडीज ने जल्दी विकेट खो दिए। इस जीत से सेमीफाइनल के लिए भारत का समीकरण सरल हो गया है।