Jayden Seales ODI Word Record : कॅरेबियन ताफ्यातील युवा जलदगती गोलंदाज जेडन सील्स याने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा डाव साधला आहे. या सामन्यात १८ धावा खर्च करताना त्याने ६ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने १२ वर्षांपासून अबाधित असलेला दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! पॉवर प्लेमध्ये 'चौकार' मग 'सिक्सर'सह Jayden Seales नं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील जेडन सील्स (Jayden Seales) याने पाकिस्तानविरुद्ध वनडेतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना त्याने पाकिस्तानच्या चौघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आणखी दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा करत त्याने वर्ल्ड विक्रमाला गवसणी घातली. वनडेत पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या नावे होता. जेडन सील्सनं या गोलंदाजाला मागे टाकले आहे.
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
१२ वर्षांपूर्वी धडाडली होती दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्टेन'गन'
दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने ९ षटकात ३९ धावा खर्च करत ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. याशिवाय थिसारा परेरा यानेही पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्स घेण्याचा डाव साधला आहे. पण त्याने ४४ धावा खर्च केल्या होत्या. या दोघांपेक्षा कमी धावा खर्च करत जेडन सील्स याने नवा विश्व विक्रम आपल्या नावे केलाय.
अशी कामगिरी नोंदवणारा पहिला गोलंदाज ठरला सील्स
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जेडन याने सॅम अयूब, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिझवान, हसन अली, बाबर आझम आणि नसीम शाह या सहा जणांची शिकार केली. सील्स हा पाकिस्तानविरुद्धच्या वनडेत सहा विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरलाय. ३० पेक्षा कमी धावा खर्च करत अशी कामगिरी नोंदवणार तो पहिला गोलंदाज आहे.
कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय सील्स
कॅरेबियन संघातील युवा गोलंदाज सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. २०२२ मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या या गड्यानं यंदाच्या वर्षात ८ वनडेत १८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. एवढेच नाही तर कसोटीत २१ सामन्यात त्याच्या खात्यात ८८ विकेट्स जमा आहेत. ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावरील २ कसोटी सामन्यात हा गोलंदाज कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.