WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ

शाहीन शाह आफ्रिदीमुळे पाकिस्तान गमावली हातातली मॅच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:39 IST2025-08-03T16:30:01+5:302025-08-03T16:39:25+5:30

whatsapp join usJoin us
WI vs PAK 2nd T20I Shaheen Afridi Villain For Pakistan As They Lose A Won Match Jason Holder Sets Major Record | WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ

WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Indies vs Pakistan, 2nd T20I : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना फ्लोरिडाच्या मैदानात खेळवण्यात आला. पहिला सामना गमावलेल्या कॅरेबियन संघाने जेसन होल्डरच्या अष्टपैलूच्या कामगिरीच्या जोरावर दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीमुळे पाकिस्तानच्या संघाने हातात आलेली मॅच घालवली. दुसऱ्या बाजूला जेसन होल्डरनं गोलंदाजीवेळी ४ विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावे केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जेसन होल्डनं मोडला ब्रोवाचा रेकॉर्ड

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्च्या बदल्यात १३३ धावा केल्या. फखर झमान २० (१९), मोहम्मद हॅरिस ३८ (३३) आणि हसन नवाझ ४० (२३) या तिघांशिवाय पाकच्या ताफ्यातील एकाहाली दुहेरी आकडा गाठता आला नाही.  वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेत ड्वेन ब्रावोचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या खात्यात आता ७४ सामन्यात ८१ विकेट्स जमा झाल्या असून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तो कॅरेबियन संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

T20I मध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • जेसन होल्डर – ८१* विकेट्स
  • ड्वेन ब्रावो – ७८ विकेट्स
  • अकील हुसैन – ७२ विकेट्स
  • रोमारियो शेफर्ड – ६४ विकेट्स
  • अल्झारी जोसेफ – ६२ विकेट्स

शाहीन शाह आफ्रिदीमुळे पाकिस्तान गमावली हातातली मॅच 

धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ संघर्ष करताना दिसला. अखेरच्या षटकात कॅरेबियन संघाला ८ धावांची आवश्यकता होती. या षटकात पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूव एक धाव खर्च केल्यावर दुसऱ्या चेंडूवर आफ्रिदीनं एक विकेट घेतली. शेफर्डला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. पण शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना शाहीन शाह आफ्रिदीनं वाइड चेंडू टाकला. त्यानंतर जेसन होल्डरनं अखेरच्या चेंडूवर चौकार मारत संघाला २ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. त्याने या सामन्यात १० चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १६ धावांची मॅच विनिंग खेळी केली.
 

 

Web Title: WI vs PAK 2nd T20I Shaheen Afridi Villain For Pakistan As They Lose A Won Match Jason Holder Sets Major Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.