Virat Kohli Breaks Silence On Test Retirement : क्रिकेट जगतातील 'रनमशिन' विराट कोहली याने जवळपास २ महिन्यानंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. ८ जुलै २०२५ रोजी लंडन येथे युवराज सिंगच्या फाउंडेशनसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने एक खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंसह सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, क्रिस गेल, रवी शास्त्री, विराट कोहली, केविन पीटरसन यासारखे दिग्गज क्रिकेटर्संनी उपस्थिती लावली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवृत्तीच्या प्रश्नावर किंग कोहलीनं दिला पिकलेल्या दाढीचा दाखला
या कार्यक्रमात गौरव कपूर याने विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहलीनं या प्रश्नाचे थेट उत्तर न देता पिकलेल्या दाढीचा दाखला देत वय झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
गौरव कूपरनं विराटला विचारला निवृत्तीसंदर्भातील प्रश्न
अँकर गौरव कपूर याने स्टेजवर उपस्थितीत युवराज सिंग, रवी शास्त्री, केविन पीटरसन, क्रिस गेल आणि डारेन गाफ यांच्याशी गप्पा मारता मारता विराट कोहलीली स्टेजवर बोलावले. फिल्डवर प्रत्येकजण तुला मिस करत आहे, अशा शब्दांत स्वागत करत गौरव कपूरनं विराट कोहलीला त्याच्या निवृत्तीवर बोलते करण्याचा प्रयत्न केला.
किंग कोहलीनं टेस्ट रिटायरमेंटसंदर्भातील प्रश्नावर असा दिला रिप्लाय
यावर रिप्लाय देताना विराट कोहली म्हणाला की, 'मी फक्त २ दिवसापूर्वीच दाढी रंगवली होती. (पिकलेली दाढी कलप करणे) सध्याच्या घडीला दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याच्या टप्प्यात आहे. असे म्हणत विराट कोहलीनं अप्रत्यक्षरित्या वय झाल्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याची गोष्ट बोलून दाखवली.
सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत
इंग्लंड दौऱ्याआधी १२ मे २०२५ रोजी विराट कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामन्यात ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या खात्यात ३० शतकांसह ३१ अर्धशकांची नोंद आहे. क्रिकेटच्या या प्रकरात ७ वेळा द्विशतकी डाव खेळणाऱ्या कोहलीच्या नावे २५४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे.