Join us

धोनीने कर्णधारपद का सोडलं, तुम्हाला माहिती आहे का...

धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धोनीने का घेतला, हे तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 16:52 IST

Open in App
ठळक मुद्देधोनीने 2014 साली भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व सोडले होते. त्यानंतर 2017 साली धोनीने एकदिवस आणि ट्वेन्टी-20 संघाचेही कर्णधारपद सोडले होते.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला होता. एकेकाळी धोनीला मिडास राजाची उपमा दिली जायची. कारण धोनीने एकामागून एक विजय भारताला मिळवून दिले होते. पण काही वर्षांनी धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धोनीने का घेतला, हे तुम्हाला माहिती आहे का...

धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने 2007 साली ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला होता. 2011 साली भारतात झालेल्या विश्वचषकातही धोनी कर्णधार असताना भारताने जेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स करंडकही पटकावला होता. धोनीने 2014 साली भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व सोडले होते. त्यानंतर 2017 साली धोनीने एकदिवस आणि ट्वेन्टी-20 संघाचेही कर्णधारपद सोडले होते.

रांचीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने याबाबत खुलासा केला आहे. धोनी म्हणाला की, " जो कुणी नवीन कर्णधार (विराट कोहली) होईल त्या खेळाडूला 2019च्या विश्वचषकाची तयारी करताना पुरेसा वेळ मिळायला हवा असे मला वाटले. कारण विश्वचषकासाठी संघबांधणी करताना तुम्हा 2-3 वर्षांचा कालावधी लागतो. या कारणासाठीच मी कर्णधारपदावर पाणी सोडले. "

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत