Join us

Virat Kohli: शतक झळकावल्यावर विराट कोहली का घेतो लॉकेटचं चुंबन त्यात काय आहे खास? पाहा 

Virat Kohli: विराट कोहली शतक फटकावल्यावर लॉकेटचं चुंबन का घेतो, त्या लॉकेटमध्ये नेमकं काय खास आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:13 IST

Open in App

 भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीमध्ये १८६ धावांची खेळी केली होती. ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील ७५ वी शतकी खेळी ठरली. दरम्यान, या शतकाचा आनंद विराट कोहलीने खास पद्धतीने साजरा केला. त्याने २८ वे कसोटी शतक पूर्ण झाल्यावर गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचं चुंबन घेतलं. त्यानंतर विराट कोहली शतक फटकावल्यावर लॉकेटचं चुंबन का घेतो, त्या लॉकेटमध्ये नेमकं काय खास आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. 

विराट कोहली जे लॉकेट गळ्यात घालतो. ती त्याची वेडिंग रिंग आहे. या लॉकेटबाबत समालोचक हर्षा भोगले यांनी एकदा सांगितले की, ही विराट कोहलीच्या प्रेमाची निशाणी आहे. तसेच तो लॉकेटचं चुंबन घेऊन पत्नी अनुष्का शर्मा हिच्या प्रति आपलं प्रेम व्यक्त करत असतो. विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा नेहमीच उभी असते. कठीण काळात ती त्याला नेहमीच साथ देते. तसेच पती विराट कोहली याला प्रोत्साहन देतानाही दिसते.

३४ वर्षीय विराट कोहली या लॉकेटचं चुंबन घेताना पहिल्यांदा जानेवारी २०१८ मध्ये दिसला होता. त्यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनच्या मैदानात १५३ धावांची खेळी केली होती. त्याचवर्षी जुलै महिन्यात २२ वं कसोटी शतक झळकावल्यानंतरही विराट कोहली त्या लॉकेटचं चुंबन घेताना दिसला होता.  

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघअनुष्का शर्मा
Open in App