कोरोना व्हायरसच्या संकटात सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध क्रीडापटू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या चाहत्यांच्या संपर्कात होते. भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह होता. त्यानं कोरोना संकटात अनेकांना आर्थिक मदतही केली. भारतीय जनता पार्टीचा खासदार असलेल्या गंभीरनं दिल्ली सरकारलाही आर्थिक मदत केली. नुकतंच त्यानं सोशल मीडियावर Ask Me Anything च्या माध्यमातून नेटिझन्सच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
ट्विटरवर गंभीरनं Ask Me Anything मधून नेटिझन्सना काही विचारण्यास सांगितले. याच सेशनमध्ये त्याला एका नेटिझन्सने, तू इतका पाकिस्तानी विरोधी का? असा प्रश्न विचारला. त्यावर गंभीरनं भन्नाट उत्तर दिलं. तो म्हणाला,''मी नाही आणि भारतीयही असतील असं मला वाटत नाही. पण. जेव्हा आमच्या जवानांचे आयुष्य आणि अन्य काही यात निवड करण्याची वेळ येते. तेव्हा आम्ही सर्व भारतीय एकाच बाजूला उभे राहिलेलो दिसू.''