Join us

India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास

भारत आणि पाकिस्तान ९ जून रोजी आमनेसामने येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 19:35 IST

Open in App

T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान ९ जून रोजी आमनेसामने येणार आहेत. हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात तेव्हा अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले असते. पाकिस्तान बाबर आझमच्या तर भारत रोहित शर्माच्या नेतृत्वात आहे. भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित सामना कोण जिंकेल याबद्दल बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने टीम इंडियावर विश्वास दाखवला. येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा खेळवली जात आहे. ९ तारखेला न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हा सामना होईल. या मैदानावर ३५ हजार प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे. (India vs Pakistan Match) 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या प्रश्न आणि उत्तर यादरम्यान व्यक्त होताना कामरान अकमलने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. अकमलला भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विचारले असता त्याने म्हटले की, नक्कीच भारत जिंकेल. मागील वेळी ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला होता. ८ चेंडूत २८ धावांची गरज असताना विराट कोहलीने हारिस रौफला सलग दोन षटकार ठोकून सामना आपल्या बाजूने फिरवला होता. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ