भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याआधी त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर त्याने क्रिकेटच्या छोट्या प्रारुपातून थांबण्याचा निर्णय घेतला होता.आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसेल. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा केल्यावर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? हा मुद्दा आता चर्चेत आलाय. यासंदर्भात वर्ल्ड कप विजेत्या माजी क्रिकेटरनं आपले मत व्यक्त केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहलाच मिळायला हवी संधी
भारतीय क्रिकेट संघाला १९८३ चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दिग्गज क्रिकेटर मदन लाल यांनी भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी जसप्रीत बुमराहचा विचार करायला हवा, असे म्हटले आहे. भारतीय कसोटी संघाच्या नव्या नेतृत्वासंदर्भातील प्रश्नावर एएनआयशी संवाद साधताना मदन लाल म्हणाले आहेत की, "जसप्रीत बुमराहला नेतृत्वाची संधी मिळायला हवी. तो खूप चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघातील तो कायमचा सदस्य आहे. संघातील अन्य काही युवा खेळाडूही आहेत. ज्यांच्यावर उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवता येईल."
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
रोहितच्या निवृत्तीनंतर बुमराकडेच कॅप्टन्सी जाते, पण...
२०२२ ते २०२५ या कालावधीत बुमराहनं भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने एक विजय मिळवला असून २ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो उप कर्णधार होता. त्यामुळेच अन्य पर्यायाचा विचार करण्याआधी तोच कर्णधारपदाचा दावेदार ठरतो. पण बीसीसीआय शुबमन गिलचा विचार करत असल्याची चर्चा आहे.
बुमराहचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड
जसप्रीत बुमराहने २०२२ मध्ये रोहितच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४-२५ च्या हंगामातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. जसप्रीत बुमराहची कामगिरीही लक्षवेधी राहिली होती. याच मालिकेतील सिडनी कसोटीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
Web Title: Who Will Replace Rohit Sharma As Test Captain Former Indian World Cup Winner Suggested Jasprit Bumrah Name Considered For The Team's Leadership Role
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.