Join us

दुसऱ्या कसोटीत विराट कोहली संघात आल्यावर कोण होणार बाहेर, टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले, अजून निश्चित नाही

IND Vs NZ 2nd Test: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक Vikram Rathore यांना पूर्ण माहीत आहे की, Cheteshwar Pujara आणि Ajinkya Rahane हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र पुढच्या सामन्यात संघातून कोण बाहेर जाणार हे ते नक्की सांगू शकले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 06:26 IST

Open in App

कानपूर : फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना पूर्ण माहीत आहे की, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र रविवारी राठोड पुढच्या सामन्यात संघातून कोण बाहेर जाणार हे नक्की सांगू शकले नाहीत. कर्णधार कोहली पुढच्या सामन्यात संघात पुनरागमन करणार आहे.

अय्यर याने पदार्पणातील कसोटी सामन्यात १०५ आणि ६५ धावा केल्या आहेत. त्यामुळे अय्यरला बाहेर केले जाऊ शकत नाही. त्यामुळे राठोड यांना ३ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या मुंबई कसोटी सामन्याच्या आधी पुजारा आणि रहाणे यांच्या फॉर्मच्याबाबतीत प्रश्नांचा सामना करावा लागेल.

राठोड यांनी याबाबत सांगितले की, पुजारा याने ९१ आणि रहाणे याने ८० कसोटी सामने खेळले आहेत. निश्चितपणे एवढे सामने खेळून त्यांनी चांगली कामगिरी केली असेल. हे दोघेही सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. मात्र त्यांनी या आधी नक्कीच काही महत्त्वाच्या आणि चांगल्या खेळी केल्या आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते दोघे नक्कीच पुनरागमन करतील. तसेच संघात कोण आणि कधी कोणत्या स्थानासाठी उपयुक्त आहे हे यावर कोण खेळेल हे नक्की करता येते. कर्णधार कोहली पुढच्या सामन्यात संघात पुनरागमन करणार आहे.  मात्र कोण संघात खेळेल आणि कोण खेळणार नाही हे मुंबईत पोहोचल्यावरच ठरवता येईल. सध्या हा सामना खेळणे आणि विजय मिळवणे एवढेच लक्ष्य आहे.’

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे
Open in App