Join us

चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  

Kuldeep Yadav's engagement : कुलदीपची होणारी पत्नी ही कानपूर एलआयसी कार्यालयात नोकरी करते. त्याहून महत्वाचे म्हणजे कुलदीपची बालपणीपासूनची मैत्रीण आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:14 IST

Open in App

भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने आयपीएल संपताच गुपचूप साखरपुडा उरकला आहे. कुलदीपच्या साखरपुड्याला रिंकू सिंह सह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. कुलदीपची होणारी पत्नी ही कानपूर एलआयसी कार्यालयात नोकरी करते. त्याहून महत्वाचे म्हणजे कुलदीपची बालपणीपासूनची मैत्रीण आहे. 

कुलदीपच्या होणाऱ्या पत्नीचे वंशिका असे नाव आहे. लखनऊमध्ये कुलदीपचा साखरपुडा पार पडला. या दोघांनी हा साखरपुडा सर्वांपासून गुप्त ठेवला होता. काही खास पाहुणे आणि दोन्ही बाजुचे कुटुंबीय सोडता कोणालाही याची माहिती नव्हती. 

वंशिका आणि कुलदीप यादव हे बालपणीचे मित्र आहेत. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाही. 

लेफ्टआर्म रिस्ट स्पिनरला चायनामनचा टॅग कसा लागला?क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात जवळपास ३० गोलंदाजांनी या गोलंदाजी शैलीसह खास छाप सोडली आहे. ब्रॅड हॉग आणि  पॉल एडम्स यासारख्या नावांसह कुलदीप यादवचा यात समावेश आहे. आता कुलदीप पुरुष क्रिकेटमध्ये भारताचा पहिला लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर आहे. ज्या चीनचा क्रिकेटमध्ये प्रभावच नाही, त्यांचा टॅग फिरकीपटूला चिकटण्यामागे एक खास इतिहास आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजाला 'चायनामन' असे संबोधले जाते. उजव्या हाताचा लेग स्पिनरचा चेंडू पडल्यावर फलंदाजापासून बाहेरच्या बाजूला वळवतो. या उलट डाव्या हाताच्या लेग स्पिनरचा चेंडू फलंदाजाच्या दिशेने वळतो. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनला धमक दाखवता आलेली नसली तरी. डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणारा (लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर) हा चीनचा होता. एलिस अचोंग असं या गोलंदाजाचे नाव. १९३३ मध्ये  इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं या चीनी वशांच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते.  इंग्लंडचा दिग्गज वॉल्टर रॉबिन्स हा वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील चीनी वंशाच्या गोलंदाजाच्या फिरकीवर फसला. चीन गोलंदाज अजब गजब प्रकारे गोलंदाजी करतोय असं म्हणत त्याने पॅव्हॅलियनचा रस्ता धरला. अन् या गोलंदाजी शैली  'चायनामन' नावाने लोकप्रिय झाली.

टॅग्स :कुलदीप यादवलग्न