Bhutans Sonam Yeshey World Record First Bowler To Take 8 Wicket Haul In T20Is : क्रिकेटच्या मैदानातील वेगवेगळ्या सामन्यात नव नवे विक्रम रचल्याचे पाहायला मिळते. काही खेळाडू अनेक वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडीत काढत चर्चेत येतात. काही खेळाडू अशक्यप्राय वाटणाऱ्या कामगिरीसह वर्षानुवर्षे कोण धक्काही लावू शकणार नाही, असा विक्रम प्रस्थापित करुन लक्षवेधी ठरतात. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचा निभाव लागणं खूपच कठीण असते. पण याच छोट्या फॉरमॅटमध्ये एक मोठा विक्रम प्रस्थापित झाला आहे. क्रिकेटच्या ज्या प्रकारात फोर विकेट हॉलची कामगिरी सर्वोत्तम मानली जाते तिथं एका गोलंदाजाने ८ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. हा विक्रम आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात नोंदवला गेल्यामुळे क्रिकेट जगात याची जोरादर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. कोण आहे तो गोलंदाज? अन् कोणत्या सामन्यात त्याने साधला विश्वविक्रमी डाव जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४ ओव्हर, ७ रन्स आणि ८ विकेट्स!
भूतान आणि म्यानमार यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात छोट्या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भूतानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १२७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना म्यानमारचा संघ अवघ्या ४५ धावांत आटोपला. भुतानच्या ताफ्यातील सोनम येशेची याने ऐतिहासिक कामगिरी करताना ४ षटकाच्या कोट्यात ८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. यासाठी त्याने फक्त ७ धावा खर्च केल्या.
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
भूतानकडून सोनम येशे याने जबरदस्त गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सामन्यात 8 विकेट्स घेतल्या.
२२ वर्षीय सोनम येशे हा या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८ विकेट्स हॉल घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी पुरुष आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ७-७ विकेट्स घेतल्या होत्या. मलेशियाच्या स्याझरुल इद्रुस याने २०२३ मध्ये चीन विरुद्धच्या सामन्यात तर बहरीनच्या अली दाऊद याने भूतानविरुद्ध ७ विकेट्सचा डाव साधला होता.