इंडियन प्रीमियर लीगची साखळी फेरी संपली आहे. अखेरीस मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहेत. सलग दुसºयांदा मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. मुंबई आतापर्यंत सर्वात चार वेळा अव्वल स्थान राखले आहे. त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने दोन वेळा अव्वल स्थान राखले आहे.
तर राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, गुजरात लायन्स, सनरायजर्स हेदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगलुरू या संघांनी प्रत्येकी एक वेळा अव्वल स्थान राखले आहे. दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला एकदाही गुणतक्त्यात अव्वल
स्थान मिळवता आलेले नाही.
मुंबई इंडियन्स २०२०,२०१९,२०१७,२०१०
सनरायजर्स २०१८
गुजरात लायन्स २०१६
चेन्नई सुपर किंग्ज २०१५,२०१३
किंग्ज इलेव्हन पंजाब २०१४
दिल्ली कॅपिटल्स २०१२,२००९
रॉयल चँलेजर्स बंगलुरू २०११
राजस्थान रॉयल्स २००८