Join us  

हार्दिक पांडयाला महेंद्रसिंह धोनीच्या आधी चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय कोणाचा ? 

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:33 AM

Open in App
ठळक मुद्देभारताने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतलीनिर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलेआम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खेळाडूचा शोध घेत होतो तो आम्हाला मिळाला आहे अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली

इंदूर -  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असणा-या हार्दिक पांड्याचं कौतुक करत स्टार खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख केला. ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने होळकर स्टेडियमवर महत्वाच्या वेळी 78 धावांची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. संघाला विजय मिळवून देण्यात हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली. प्रमोशन देत चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्याने 72 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या. फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही हार्दिक पांड्या चमकला. दोन विकेट्स मिळवण्यात तो यशस्वी झाला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने सांगितलं की, 'हार्दिक पांड्या एक स्टार खेळाडू आहे. तो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही करतो. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खेळाडूचा शोध घेत होतो तो आम्हाला मिळाला आहे. अशा खेळाडूमुळे संघात समतोल राखण्यास मदत मिळते.'

हार्दिक पांड्याला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजीला पाठवण्याबाबत जेव्हा विराट कोहलीला विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की, 'प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ऑस्ट्रेलियावर मात करायची असेल तर आपल्याला स्पिनर्सवर हल्ला करण्याची गरज आहे'. पुढे बोलताना विराट कोहलीने सांगितलं की, 'हार्दिक पांड्या भारतासाठी एक एक मौल्यवान खेळाडू आहे. तो कधीच स्वत:वर अविश्वास दाखवत नाही. त्याला स्वत:वर आत्मविश्वास असून आव्हान द्यायला आवडतं'.  

मॅन ऑफ द मॅच हार्दिक पांड्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मला खूप चांगलं वाटतंय, पण सामना संपवू शकलो नाही याचं दुख: आहे. मला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, मी याकडे एक संधी म्हणून पाहिलं. एश्टनविरोधात आक्रमक खेळी करायचं मी ठरवलं होतं. जेव्हा मी षटकार मारला तेव्हा मला आत्मविश्वास मिळाला. मला संघात आपलं योगदान देण्यास आवडेल. मला अजून सुधार करायचा आहे'.

रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य आॅस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ६ बाद २९३ धावा उभारल्या. भारताने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेटविराट कोहलीआॅस्ट्रेलियाएम. एस. धोनी