Who Can Replace Josh Hazlewood in RCB vs SRH IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या १९ व्या हंगामातील सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. शनिवारी, २८ मार्चला रंगणाऱ्या या लढतीत RCB चा संघ जोश हेजलवूडच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. तगडी फलंदाजी असणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मॅच विनर गोलंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी RCB चा संघ न्यूझीलंडच्या मध्यम जलगती गोलंदाजावर डाव लावताना पाहायला मिळू शकते. इथं जाणून घेऊयात या गोलंदाजाची खासियत अन् IPL मध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेल्या गोलंदाजाच्या खास रेकॉर्डवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅच विनर गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणार RCB चा संघ
आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्याआधी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी पुष्टी केली की, हेझलवूडच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, परंतु तो निवडीसाठी कधी उपलब्ध होईल याबद्दल त्यांनी कोणतीही विशिष्ट वेळमर्यादा दिली नाही. हा ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज गेल्या हंगामात आयपीएल जिंकणाऱ्या संघाचा एक महत्त्वाचा सदस्य होता, त्याने गत हंगामात १२ सामन्यांमध्ये १७.५४ च्या सरासरीने आणि ८.७७ च्या इकॉनॉमी रेटने २२ बळी घेतले होते.
Virat Kohli: विराट कोहली बनणार आशियाचा नवा क्रिकेट सम्राट; मोठ्या विक्रमापासून फक्त २९ धावा दूर!जेकब डफी सर्वोत्तम पर्याय
शनिवारी बंगळूरुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर जोश हेजलवूडच्या जागी रॉयल चॅलेंजर्स संघाकडून जेकब डफीला संधी मिळू शकते. अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात RCB नं न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजाला २ कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आले होते. हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पॉवरप्लेमध्ये चेंडू स्विंग करू शकतो आणि अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना त्याच्याकडे चांगले वैविध्यही आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये १६८ विकेट्स
एप्रिल २०२५ मध्ये आयसीसी टी-२० क्रमवारीत डफी अव्वलस्थानावर पोहचला होता. या ३१ वर्षीय खेळाडूने ४८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने २०.२५ च्या सरासरीने आणि ८.०८ च्या इकॉनॉमी रेटने ६२ बळी घेतले आहेत, ज्यात पाच वेळा चार बळी घेण्याच्या कामगिरीचा समावेश आहे. त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीत, त्याने १६८ सामन्यांमध्ये २५.१३ च्या सरासरीने आणि ८.५० च्या इकॉनॉमी रेटने १८९ बळी घेतले आहेत.
न्यूझीलंडकडून एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजडफी हा अलीकडच्या काळात चांगल्या फॉर्ममध्ये नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच सामन्यात फक्त ५ विकेट्स घेतल्या होत्या. पण गत वर्षी या पठ्ठ्यानं एका कॅलेंडर ईयरमध्ये ८१ विकेट्स घेत खास विक्रमाला गवसणी घातली होती. न्यूझीलंडकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. या कामगिरीसह त्याने भारताच्या झहीर खान (२००७), ब्रेट ली (२००८), शोएब अख्तर (२००२), आर. अश्विन (२०१३), रबाडा (२०१६) यांच्या पंक्तीत स्थान मिळवले होते.
Web Summary : With Hazlewood absent, RCB might pick Jacob Duffy against SRH. The Kiwi bowler, bought for ₹2 crore, offers swing and variety. He boasts 189 T20 wickets. Despite recent form, Duffy once topped T20 rankings and holds a New Zealand wickets record.
Web Summary : हेज़लवुड की अनुपस्थिति में, RCB SRH के खिलाफ जैकोब डफी को चुन सकती है। 2 करोड़ रुपये में खरीदे गए कीवी गेंदबाज, स्विंग और विविधता प्रदान करते हैं। उनके नाम 189 टी20 विकेट हैं। हालिया फॉर्म के बावजूद, डफी कभी टी20 रैंकिंग में शीर्ष पर थे।